तीन आरोपींकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

By देवेंद्र पाठक | Updated: September 1, 2022 00:07 IST2022-09-01T00:07:10+5:302022-09-01T00:07:16+5:30

दोंडाईचासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चाेरीचे सत्र सुरू होते. त्यामुळे दुचाकीमालक त्रस्त झालेले होते

10 stolen bikes seized from three accused, police action in Dondai dhule | तीन आरोपींकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

तीन आरोपींकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त, दोंडाईचा पोलिसांची कारवाई

देवेंद्र पाठक

धुळे : विविध ठिकाणीहून चोरीला गेलेल्या सुमारे चार लाख रूपये किंमतीच्या  दहा जुन्या दुचाकीसह तीन चाेरट्यांना दोंडाईचा पोलिसांनी  बुधवारी ताब्यात घेतले आहे. यातील  एकजण अल्पवयीन आहे. दुचाकी चोरट्याचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.  

दोंडाईचासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चाेरीचे सत्र सुरू होते. त्यामुळे दुचाकीमालक त्रस्त झालेले होते. दोंडाईचा पोलिसांनी या चोरीचा तपास करीत बुधवारी  राहुल मोतीलाल पवार (वय २६ रा. गोपालपुरा दोंंडाईचा), जयेश संजय धनगर, (वय १९, रा. मालपूर)  या दोन दुचाकी चोरांना  जेरबंद केले.  तर त्यांचा तिसरा साथीदार अल्पवयीन आहे. पाेलिसांनी त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत.  तर या संशयित चोरट्यांकडून   आणखी चोरी गेलेल्या दुचाकीची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   ही कारवाई  पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोंंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश  तिवारी, गुन्हेगार गोपनीय शाखेचे ए. एस. आय.राजू दुसाने, संदीप कदम, पोलीस नाईक प्रेमराज पाटील,  पोलीस शिपाई योगेश पाटील, अनिल धनगर, हिरालाल सुर्यवंशी यांच्या पथकाने केलेली आहे. 

Web Title: 10 stolen bikes seized from three accused, police action in Dondai dhule