१ दिवसाचे नवजात बाळ ट्रकमध्ये सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 21:44 IST2018-08-23T21:43:26+5:302018-08-23T21:44:17+5:30
टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं.

१ दिवसाचे नवजात बाळ ट्रकमध्ये सापडले
विरार - विरार पूर्व येथील साईनाथ पेट्रोल पंपाजवळील एका चहाच्या स्टॉलला चहा पिण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाला लहान बाळ रडल्याचा आवाज येत होता. त्याने आजूबाजूला पहिले तर एका कार्गोवाहू ट्रकमध्ये बेडशीटमध्ये गुंडालेलं बाळ त्याने पहिले आणि याबाबत लागलीच विरार पोलीसांना माहिती दिली.
टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं. याबाबत पोलीसांनी माहिती मिळताच त्याठिकाणी येऊन लहान बाळाला ताब्यात घेतले. हे लहान बाळ कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची तब्येत ठीक आहे. पोलीसांना अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा म्हणून त्याला अज्ञातांनी बेवारस सोडले असल्याचा संशय आहे.