शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा महाविद्यालय.. जोड

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

धनवटे नॅशनल कॉलेज

धनवटे नॅशनल कॉलेज
फोटो स्कॅन
नागपूर : धनवटे नॅशनल कॉलेज येथे शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ ला प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी कॉलेजचे विविध उपक्रम व विद्यार्थी उपयोगी विविध समित्यांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा महाविद्यालयातर्फे पूर्ण करण्यात येतील असा विश्वास दिला. तत्पूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम आणि रा. सू. गवई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पी.एस. चंगोले यांनी प्रास्ताविक केले. आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. आर.डी. भालेकर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुराधा खेर्डेकर व आभार प्रदर्शन डॉ. पराग जोशी यांनी केले.
सेंट्रल इंडिया कॉलेज
फोटो स्कॅन
नागपूर : मेहमुदा शिक्षण व महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सेंट्रल इंडिया कॉलेज, गोधनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपमहापौर मुन्ना पोकुलवार व सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक के.ए. मिश्रीकोटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ. अनिस अहमद व संजय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. के.ए. मिश्रीकोटकर यांनी वृक्षारोपणाबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला चौधरी मॅडम व प्राचार्य विनय मानकर हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनजित साखरे यांनी केले.
संजुबा हायस्कूल
फोटो स्कॅन
नागपूर : रे स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय योगा स्पर्धेचे संजुबा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेतील विविध गटामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२ स्वर्ण पदकासह तब्बल ३० पदक जिंकले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेच्या संचालिका मोटवानी मॅडम, प्राचार्या पांडे मॅडम, पाटील सर, भागवतकर मॅडम, वैद्य मॅडम, राऊत मॅडम, क्रीडा शिक्षक चेतन घुले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.