शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील सहा तालुक्यात अतीवृष्टी

By admin | Updated: September 9, 2014 21:14 IST

सरासरी ७३.६३ मि.मी. पाऊस; नदी-नाल्यांना पूर.

अकोला : गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला असून, जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली आहे. सार्वत्रिक मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ८.३0 वाजतापासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू झाला, दिवसभर मुसळधार पाऊस बरसला, रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. तसेच सोमवारीदेखील दिवसभर पाऊस सुरूच होता. गेल्या चोवीस तासांत बरसलेल्या धो-धो पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.** अतवृष्टीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!गेल्या चोवीस तासांत सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यामध्ये अकोला, बाश्रीटाकळी, आकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाल्याचा अहवाल, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.** अकोल्यात ४.0२ मि.मी.पाऊस!रविवारी जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस बरसला असून, सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टीदेखील झाली. दुसर्‍या दिवशी सोमवारीसुद्धा जिल्हाभरात रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात ४.0२ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ** काटेपूर्णा ३३ टक्क्यांवर; निगरुणा १00 टक्के भरले!रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली. त्यामध्ये निगरुणा धरण १00 टक्के भरले असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा सोमवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत ३२.२६ टक्क्यांवर पोहोचला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. ** वाशिम पाटबंधारे विभागाची अकोल्याला सूचना !वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल या धरणात अनुक्रमे ७२ व ५८ टक्के वाढ झाली असून, पाऊस असाच सुरू राहिल्यास या धरणांच्या पातळीत वाढ होणार असल्याने काटेपूर्णा धरणाची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशिम पाटबंधारे विभागाने अकोला पाटबंधारे विभागाला तशी सूचना केली आहे.