विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:50 PM2023-12-10T15:50:57+5:302023-12-10T15:52:26+5:30

आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

Vishnu Deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh the decision was taken in the BJP legislature party meeting | विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

भाजपने छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री दिला आहे. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय, हे आता छत्तीसगडच्यामुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना दिसतील. यासंदर्भात भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत रविवारी निर्णय घेण्यात आला आहे. आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, जर भारतीय जनता पक्षाने 2003 ते 2018 पर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमन सिंह, यांची निवड केली नाही तर, एखाद्या ओबीसी प्रवर्गातील अथवा आदिवासी समुदायातील नेत्याचीच मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाईल, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता आणि झालेही तसेच. 

कोण आहेत विष्णुदेव राय -
विष्णुदेव राय हे छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदार संघातील आहेत. राज्यात आदिवासी समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि विष्णुदेव राय याच समुदायातून येतात. राय 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याशिवाय ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही होते. महत्वाचे  म्हणजे, राय यांची गणना संघाच्या काही जवळच्या नेत्यांमध्ये होते. ते रमन सिंह यांच्याही जवळचे आहेत. ते 1999 ते 2014 पर्यंत रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते. 

असे आहे छत्तीसगडचे बलाबल -
छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथील 90 जागांपैकी  भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाला (जीजीपी) एक जागा मिळाली आहे.

Web Title: Vishnu Deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh the decision was taken in the BJP legislature party meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.