छत्तीसगडसाठी ऐतिहासिक क्षण! २५ वर्षांनंतर मिळणार भव्य विधानसभा; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 21:10 IST2025-10-31T21:07:40+5:302025-10-31T21:10:42+5:30
Chhattisgarh New Vidhan Sabha Building: एकूण 51 एकर परिसरात पसरलेल्या या संकुलाचे बांधकाम 324 कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे.

छत्तीसगडसाठी ऐतिहासिक क्षण! २५ वर्षांनंतर मिळणार भव्य विधानसभा; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
Chhattisgarh New Vidhan Sabha Building Inauguration: छत्तीसगडच्या इतिहासात 1 नोव्हेंबरला एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन विधानसभा भवन समर्पित केले जाईल. 2000 साली राज्याची स्थापना झाल्यानंतर 25 वर्षांनी, म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षात रायपूरच्या राजकुमार कॉलेजमधून सुरू झालेल्या छत्तीसगड विधानसभेला आता स्वतःचे भव्य, आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त कायमस्वरूपी भवन मिळणार आहे.
आधुनिकता आणि परंपरेचा संगम
धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडची ओळख या भवनाच्या वास्तुकलेतही उत्कृष्टपणे गुंफली गेली आहे.
कृषी-प्रधान संस्कृतीचे प्रतीक - विधानसभेच्या सभागृहाच्या छतावर धान्याच्या ओंब्या आणि पाने कोरलेली आहेत, जी राज्याच्या कृषी-प्रधान संस्कृतीचे प्रतीक आहेत.
पारंपरिक कला - इमारतीचे बहुतेक दरवाजे आणि फर्निचर बस्तरच्या पारंपरिक काष्ठ शिल्पकारांनी तयार केले आहेत. नवीन विधानसभा भवन आधुनिकता आणि परंपरेचा एक उत्कृष्ट संगम म्हणून तयार करण्यात आले आहे.
भविष्याच्या गरजा लक्षात लक्षात घेऊन अत्याधुनिक भवन
नवीन विधानसभा भवनाची उभारणी वर्तमान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. हे भवन सर्वसुविधायुक्त आणि सुसज्ज आहे, या सभागृहात 200 आमदार बसण्याची क्षमता वाढवता येऊ शकते.
स्मार्ट विधानसभा - पेपरलेस विधानसभा कामकाजासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधांचाही यात समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे हे भवन ‘स्मार्ट विधानसभा’ म्हणून विकसित होणार आहे.
324 कोटी खर्च, 51 एकरात परिसर
एकूण 51 एकर परिसरात पसरलेल्या या संकुलाचे बांधकाम 324 कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. भवनाला तीन मुख्य भागांमध्ये विंग-ए, विंग-बी आणि विंग-सी मध्ये विभाजित केले आहे.
विंग-ए : विधानसभा सचिवालय
विंग-बी : सभागृह, सेंट्रल हॉल, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय
विंग-सी : मंत्र्यांची कार्यालये
हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक बांधकाम
हे भवन पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि हरित बांधकाम तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे. परिसरात सौर ऊर्जा संयंत्र उभारले जात आहे, त्याचबरोबर पावसाचे पाणी साठवण्यासाठी दोन तलाव देखील बांधले जात आहेत. याशिवाय, इमारतीत पर्यावरण-संरक्षणाचे सर्व नियम पाळले गेले आहेत.
या सुविधा असणार
विधानसभा भवनामध्ये 500 आसनक्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियम आणि 100 आसनक्षमतेचा सेंट्रल हॉल बनवण्यात आला आहे. भवनाची वास्तुकला आधुनिक आणि पारंपरिक शैलींचे उत्कृष्ट मिश्रण आहे.