शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुरात निराधारांचा तर सेलूत आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.

जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.सकाळी ११ वाजता निघालेला हा मोर्चा विजय भांबळे यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयावर पोहचला. मागील अनेक दिवसांपासून निराधारांचे प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. शासकीय पातळीवर बैठका होत नसल्याने निराधार मानधनापासून वंचित आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला विजय भांबळे, नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले. भांबळे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपण जनतेसाठी रस्त्यावर येऊन भांडू. शेतकरी, अपंग, निराधार यांचे प्रश्न शासनदरबारी लावून धरु. प्रशासनाने मोर्चाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन दिले. मोर्चासाठी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, शरद अंभुरे, शौकत लाला, रामेश्वर जावळे, अजय चौधरी, सुनिल घुुगे, अविनाश काळे, गजानन कांगणे, रामप्रसाद भांबळे, गजानन चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)