शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़चे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर येईना़़़

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

नांदेड:जिल्हा परिषदेचे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर आणण्याचा समाजकल्याण समितीत ठराव झाल्यानंतरही हे कार्यालय तळमजल्यावर आणण्यास विलंब होत असल्याने अपंगांची हेळसांड सुरूच आहे़

 नांदेड:जिल्हा परिषदेचे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर आणण्याचा समाजकल्याण समितीत ठराव झाल्यानंतरही हे कार्यालय तळमजल्यावर आणण्यास विलंब होत असल्याने अपंगांची हेळसांड सुरूच आहे़ मंगळवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत समिती सदस्या वर्षा भोसीकर यांनी या विषयावर पुन्हा एकदा प्रशासनास धारेवर धरले़ जिल्हा परिषदेची लिफ्ट दोन वर्षापासून बंद आहे़ ही लिफ्ट सुरू करण्यात येत असली तरी समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर आणण्याचा ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही असा प्रश्न वर्षाताई भोसीकर यांनी मांडला़ मात्र या प्रश्नावर खुद्द समाजकल्याण समिती सभापती मंगाराणी अंबुलगेकर याही गंभीर नसल्याने प्रशासनाकडूनही चालढकलच केली जात आहे़ तळमजल्यावर कार्यालयासाठी जागा नसल्याचे कारण प्रशासन देत आहे तर समिती सभापतींसाठी तळमजल्यावर कक्ष कसा करता येईल हा प्रश्नही पुढे आला आहे़ त्यामुळे अपंगांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि समाजकल्याण समिती किती गंभीर आहे हेच दिसून येत आहे़ मंगळवारी झालेल्या बैठकीच्या प्रारंभीच २४ एप्रिल रोजी आयोजित बैठक रद्द का केली याबाबतही सौ़ भोसीकर यांनी प्रश्न उपस्थित केला़ ही बैठक रद्द अथवा पुढे ढकलली याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती सदस्यांना का दिली नाही याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली़ खुलासा येईपर्यंत बैठक पुढे चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका वर्षा भोसीकर यांनी घेतली़ यावेळी समाजकल्याण समिती सभापती मंगाराणी अंबुलगेकर यांनी मध्यस्थी करीत बैठकीस सुरूवात केली़ (प्रतिनिधी)