क्षुल्लक कारणावरून युवकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:32 IST2019-01-27T23:32:08+5:302019-01-27T23:32:24+5:30
खानावळीत जेवणासाठी जात असलेल्या युवकास क्षुल्लक कारणावरून तिघांनी जबर मारहाण केली.

क्षुल्लक कारणावरून युवकास जबर मारहाण
औरंगाबाद : सिडको एन-५ येथील खानावळीत जेवणासाठी जात असलेल्या युवकास क्षुल्लक कारणावरून तिघांनी जबर मारहाण केली. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आकाश देवकर (२४) असे जखमी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश देवकर (२४) हा मिलननगर येथे राहत असून, तो खाजगी नोकरी करतो. २७ जानेवारी रोजी आकाश सायंकाळी ७:३० वाजता मित्रांसोबत खानावळीत जेवणासाठी जात होता. त्यावेळी कृष्णा शिंदे याने आकाशला हटकले व तुम्ही माझ्याकडे पाहून का हसतात, असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचवेळी आणखी दोघे जण तेथे आले व त्यांनी आकाशला बेदम मारहाण केली. यात आकाशच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यास आठ टाके पडले. फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.