रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:45 IST2019-01-20T16:45:10+5:302019-01-20T16:45:26+5:30
छावणी परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली.

रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : छावणी परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली.
आनंद सूर्यभान मस्के (वय २५, गवळी शिवार, ता. गंगापूर), असे मृताचे नाव आहे. छावणी पोलिसांनी सांगितले की, छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजले होते. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृत हा आनंद म्हस्के असल्याचे पोलिसांना समजले.
तो वाहनचालक म्हणून काम करीत होता. आनंदने शुक्रवारी दुपारी त्याचे मालवाहू पिकअप वाहन माल भरण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत उभे केले. त्यानंतर हप्ता भरण्यासाठी तो औरंगाबादमध्ये आला होता, असे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. याविषयी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहेकॉ. खंडागळे तपास करीत आहेत.