उतारवयातही कायम तरुणाईचा जोश !
By Admin | Updated: September 26, 2014 01:54 IST2014-09-26T00:40:02+5:302014-09-26T01:54:39+5:30
बीड: ‘अजिब दासताँ है ये’ या फिल्मी गीतावर आजोबा - आजीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मावळतीकडे झुकलेले अनेक जोडपे थिरकत होते.

उतारवयातही कायम तरुणाईचा जोश !
बीड: ‘अजिब दासताँ है ये’ या फिल्मी गीतावर आजोबा - आजीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मावळतीकडे झुकलेले अनेक जोडपे थिरकत होते. हा करीष्मा मंगळवारी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिसून आला.
नाट्य परिषदेच्या बीड शाखेतर्फे हिट फिल्मी गाणी, बहारदार नृत्य, लग्नाच्या गोष्टी, भारूड, भावगीत आणि सोबतच फॅन्सी ड्रेस स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साठीकडे झुकलेली तरूणाई सुमारे तीन ते साडेतीन तास विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जल्लोषात आपले वय विसरून गेली होती. यावेळी ‘माझ्या लग्नाची गोष्ट’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करीत साठीच्या पुढील जोडपी आपल्या तारूण्यात केंव्हा गेली कळालीच नाही. अॅड. कालिदास थिगळे, सत्यनारायण लाहोटी, डॉ. विश्वास जोशी आणि जनार्दन दोडके या जोड्यांनी आपले अनुभव सांगितले. विविध कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमात या कलावंतांनी आपल्या अभिनयाचा कसच दाखविला. विठ्ठलराव राजहंस यांचा जोकर असो की ‘ना हिंदु बनेगा ना मुसलमान बनेगा’ हा सामाजिक स्पर्श करणारा भाव व्यक्त करणारे डॉ. विजय क्षीरसागर असोत. गायन कलेतील सगळेच प्रकार उकलत उकलत तीन- साडेतीन तास कसे गेले कळालेच नाहीत. नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी ‘अजिब दासताँ है ए’ हे गीत सादर करून आपले वेगळेपण दाखविले. या कार्यक्रमात शालिनी कुलकर्णी, कमल देशमुख, आरोळे, सुधाकर धसे, वर्षा जोशी, प्रा. अनिता शिंदे, प्रज्ञा देशपांडे, लिला मानुरकर, क्षमा देवगावकर, स्वयंप्रकाश खडके, पुरूषोत्तम देवगावकर, उदय व उमा कसरेकर, किशोरसिंह बुंदेले, डी.एस. कुलकर्णी, भरत लोळगे, प्रभाकर कुलकर्णी, बाळकृष्ण बडवे, गणपत देशमुख, सुमती पिंगळे, माया व संजय खांदाट, संगीता व सुधाकर रामदासी आदींचे अभिनय प्रेक्षकांना भावून गेले. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला. काश्मिरमधील पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्तीतील आपत् ग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. डॉ. दीपा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ रंगकर्मी कुलदीप धुमाळे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकारला. या कार्यक्रमात प्रा. दुष्यंता रामटेके, मधुकर वडमारे, डॉ. विद्यासागर पाटांगणकर, डॉ. सतीश साळुंके, डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. सुरेखा जोशी, प्रा. दिपक जमदाडे, प्रा. सुरेश थोरात, प्रा. लक्ष्मीकांत दोडके, मिलिंद शिवणीकर आणि शेख यांचा संयोजनात सहभाग होता.(प्रतिनिधी)