शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी देशाला मजबूत करावे

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : संपूर्ण देशात जेथे सर्वाधिक देशभक्ती दिसून येते, असे महाराष्ट्र राज्य आहे. येथील ही देशभक्तीची शक्ती संपूर्ण देशाला मजबूत करीत आहे.

औरंगाबाद : संपूर्ण देशात जेथे सर्वाधिक देशभक्ती दिसून येते, असे महाराष्ट्र राज्य आहे. येथील ही देशभक्तीची शक्ती संपूर्ण देशाला मजबूत करीत आहे. संस्कृती, परंपरा कायम राहिली पाहिजे. युवकांनी मी भारतीय आहे असा विचार करावा आणि देशाला मजबूत करावे, असे आवाहन अ.भा. दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी केले.देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिट्टा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रदीप चव्हाण, मोहन सावंत, अविनाश येळीकर, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. यावेळी बिट्टा म्हणाले, कोणी डॉक्टर बनण्यासाठी, तर कोणी इंजिनिअर बनण्यासाठी शिक्षण घेत आहे; परंतु जे शिक्षण घेत आहोत, त्यातून देशाचे नाव संपूर्ण जगात कसे होईल, याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. युवकांनी देशाचा इतिहास वाचला पाहिजे. आजच्या पिढीसाठी काय काय केले आहे, हे त्यातून कळेल. देशाला दहशतवादापासून कसे मुक्त करायचे, हा आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले राजकीय लोक आणि आजचे राजकीय लोक यांच्या विचारसरणीत बदल झालेला दिसतो; परंतु सगळेच वाईट नाहीत, असे ते म्हणाले. प्रारंभी शहीद जवानांच्या नातेवाईकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.सीमा सुरक्षेचा प्रश्नचीन, बांगलादेश, पाकिस्तान देशात घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तसेच दहशतवाद्यांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड अथवा जन्मठेप सुनावण्यात यावी, यासाठी दहशतवादविरोधी लष्करी न्यायालय स्थापन करण्याची गरज आहे. जे दहशवाद्यांना मदत करतील, त्यांनाही यानुसारच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत बिट्टा यांनी दिली. आंदोलकांनी आपल्या कार्यातच राहिले पाहिजे. आंदोलक राजकारणात आले तर काय होते हे दिसून आले आहे. काँग्रेस आपली आई असल्याचेही ते यावेळी म्हणाले.