राजकारण,समाजकारणात युवक हा महत्त्वाचा बिंदू
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:43:50+5:302014-08-17T00:54:33+5:30
नांदेड : युवक हा नेहमीच जागृत असतो़ त्याला योग्य दिशा देण्याचे काम जागर युवा शक्तीचा यासारख्या कार्यक्रमातून केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी केले़

राजकारण,समाजकारणात युवक हा महत्त्वाचा बिंदू
नांदेड : राजकारण, समाजकारणात युवक हा महत्त्वाचा बिंदू आहे़ युवक हा नेहमीच जागृत असतो़ त्याला योग्य दिशा देण्याचे काम जागर युवा शक्तीचा यासारख्या कार्यक्रमातून केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी केले़
नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्या साधून शनिवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित ‘जागर युवा शक्तीचा’ या कार्यक्रमात सावंत बोलत होते़ अध्यक्षस्थानी नांदेड पंचायत समिती सभापती बंडू पावडे तर उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, संगीता पाटील डक, सुमती व्याहाळकर, अॅड़निलेश पावडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, केदार पाटील, पिंकू पोकर्णा, महेश देशमुख तरोडेकर, बाळासाहेब रेंगे पाटील, माधवराव वाघ, बापूराव पाटील शिंदे, दीपक पाटील पिंपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात २००९ ची विधानसभा निवडणूक लढविली़ यावेळी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला १०० टक्के यश मिळाले़ त्याची पुनरावृत्ती २०१४ मध्ये करून राज्याचे नेतृत्व असलेल्या अशोकराव चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हा संदेश पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविण्याचे काम आगामी निवडणुकीत करावे़ युवकांनी समाजकारण करीत राजकारण कराव़े़ प्रास्ताविक नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले़ युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, केदार पाटील, सरचिटणीस महेश देशमुख तरोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये तर सुषमा थोरात यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी उमेश कोटलवार, गोपी मुदीराज, किशन कल्याणकर, रहीम पटेल आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)