शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘सृजन’चे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:52 IST

येत्या रविवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवास सुरुवात होत असून, यामध्ये आतापर्यंत १८० महाविद्यालयांतील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि अडीचशेपेक्षा जास्त संघप्रमुख सहभागी होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येत्या रविवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवास सुरुवात होत असून, यामध्ये आतापर्यंत १८० महाविद्यालयांतील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि अडीचशेपेक्षा जास्त संघप्रमुख सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध १५ प्रमुख समित्या आणि ६० विद्यार्थी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी मंगळवारी (दि.२४) पत्रकार परिषदेत दिली.२९ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणा-या या महोत्सवाचे रविवारी सकाळी ११ वाजता अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते नृत्य विभागाच्या खुल्या मंचावर उद्घाटन आणि येथेच १ नोव्हेंबर रोजी अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. ‘बक्षीस स्वीकारताना विद्यार्थी जल्लोष करतात. बंद सभागृहात अशा प्रकारचा जल्लोष करण्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा खुल्या मंचावर उद्घाटन व समारोप सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. खान म्हणाले.महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी विद्यापीठातील सात मंच सज्ज करण्यात आले आहेत. त्यांना सृजनरंग, लोकरंग, नाट्यरंग, नटरंग, ललितरंग, शब्दरंग आणि नादरंग अशी नावे देण्यात आली आहेत. विजेत्यांच्या निवडीसाठी एकूण ५७ परीक्षकांची निवड करण्यात आली असून, ते सर्व औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांबाहेरील आहेत. सर्व स्पर्धक व संघ प्रमुखांची विद्यापीठ परिसरातील वसतिगृहांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून, बास्केटबॉल कोर्टवर जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.