शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

नशेच्या दलदलीत तरुणाई; मद्यासोबतच कोकेन, बटण, एमडी, व्हाइटनर, गांजाची चटक

By संतोष हिरेमठ | Updated: August 14, 2025 18:50 IST

मद्यापेक्षा इतर पदार्थांच्या व्यसनांमुळे केंद्रांत दाखल होणारे अधिक; पस्तीशीच्या आतील अधिक

छत्रपती संभाजीनगर : व्यसन म्हटले की, फक्त मद्यपान, अशी स्थिती आता नाही. कारण शहरात मद्यपानाशिवाय इतर व्यसनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परिणामी, शहरात व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढली आहे. व्यसनामुळे प्रकृती खालावल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये आणि व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांत दाखल होणाऱ्यांमध्ये इतर पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. चिंताजनक म्हणजे यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे.

मानसिक आरोग्य आढावा मंडळाअंतर्गत शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांची नोंदणी होते. जिल्हा रुग्णालयातील मनोविकार विभागप्रमुख डाॅ. जितेंद्र डोंगरे म्हणाले, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. एमडी ड्रग, व्हाइटनर इ.चे व्यसन वाढत आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची वेळोवेळी पाहणी केली जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले.

शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या-१७

याचे वाढले व्यसनमनोरुग्णांच्या उपचारासाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या या ‘बटण’ नावाने चर्चेत आहेत. यांचे सेवन तरुणाईत वाढले आहे. कारण या गोळ्या खाल्ल्यानंतर कोणताही वास येत नाही. त्यामुळे मुलेही हे व्यसन करीत आहेत. त्याबरोबरच एमडी, कॅनाबिस, कोकेन, ब्राऊन शुगर, इंजे. पेंटाझोसीन, स्टिकफास्ट, व्हाइटनरचे व्यसन अधिक आहे.

३० टक्के रुग्ण मद्यपी, ७० टक्के इतर व्यसनीशहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात महिनाभरात ६२ रुग्ण दाखल झाले. यात ३० टक्के रुग्ण मद्यपान करणारे होते. ७० टक्के रुग्ण हे ‘बटण’, चिकटवण्याचे द्रव, गांजा इ.चे व्यसन करणारे होते.

एकाच वेळी १० ते १५ गोळ्याव्यसनाचे प्रमाण व्यक्तीमध्ये वाढल्यानंतर एकाचवेळी १० ते १५ ‘बटण’ गोळ्या खातात. गोळ्यांसोबत किमान दोन ते तीन अमली पदार्थ एकत्र करून सेवन करण्याचा प्रकारही होतो.

इतर व्यसन वाढलेउपचारासाठी दाखल होणाऱ्यांमध्ये मद्यपी रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. इतर व्यसनांच्या रुग्णांचे प्रमाण हे ६० टक्के आहे. एमडी, कॅनाबिस, कोकेन, ब्राऊन शुगर, इंजे. पेंटाझोसीन, चिकटवण्याचे द्रव, व्हाइटनरचे व्यसन वाढत आहे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ.

तरुणाईचे प्रमाण अधिकव्यसन सुटण्यासाठी दाखल होणाऱ्यांमध्ये १८ ते ३५ या वयोगटाचे म्हणजे तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकाच वेळी १० ‘बटण’ खाणारेही येतात. इतर व्यसने करणारेही येतात.- डाॅ. सुनील नागरगोजे, व्यसनमुक्ती केंद्र चालक.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर