शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

आत्महत्या करण्यासाठी निघालेला युवक बनला कादंबरीकार, मराठी साहित्य विश्वात ‘टिश्यू पेपर’चा गाजावाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:45 IST

स्वस्त धान्य दुकानात हक्काचं रेशन मिळत नाही. रेशन मागितलं तर दुकानदार अपमानास्पद वागणूक देत हाकलून देतो. याची प्रशासनाकडे दाद मागितली पण काही उपयोग झाला नाही.

- राम शिनगारे औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानात हक्काचं रेशन मिळत नाही. रेशन मागितलं तर दुकानदार अपमानास्पद वागणूक देत हाकलून देतो. याची प्रशासनाकडे दाद मागितली पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या युवकाने आत्महत्या करण्याविषयी सोशल मीडियात पोस्ट टाकली आणि घरातून निघून गेला. पोस्ट वाचून मित्रांनी त्याचा शोध घेऊन त्याला त्या विचारापासून परावृत्त केले. त्याच युवकाची स्वत:च्या जगण्याच्या संघर्षावर बेतलेली ‘टिश्यू पेपर’ ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कडचा रमेश रावळकर हा युवक १९९५ साली औरंगाबादेत दाखल झाला. घरची परिस्थिती बेताची... मात्र, चिकाटीच्या जोरावर त्याने पीएच.डी. पूर्ण केली. त्यासाठी त्याला बारमध्ये वेटरचे काम करावे लागले. त्याचवेळी साहित्याची गोडी लागली. दोन कवितासंग्रहही लिहिले. प्राध्यापकासाठी आवश्यक पात्रता मिळवूनही पूर्णवेळ नोकरी काही मिळाली नाही. तासिका तत्त्वावर दिवसा शिकवायचे आणि रात्री हॉटेलमध्ये काम करायचे. एक-दोन प्रसंगात तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाच हॉटेलमध्ये सर्व्हिस द्यावी लागली. तरीही त्यांनी कधी कामाची लाज बाळगली नाही.    रेशन दुकानदाराला धान्य मागितल्याने अपमानस्पद वागणूक देत हाकलून दिले. त्यामुळे निराश झालेले रावळकर आत्महत्या करण्याची पोस्ट सोशल मीडियात टाकून निघून गेले होते. तेव्हा त्यांचे मित्र पी. विठ्ठल, कैलास अंभुरे यांच्यासह इतरांनी मनपरिवर्तन केले. यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळाली. यातून त्यांना जगण्याची उमेद मिळाली. वेटरचे काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित ३३२ पानांची ‘टिश्यू पेपर’ ही  कादंबरी लिहिली.  

बारबाला, वेटरच्या वास्तव जीवनाचे केले चित्रण ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत  शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका युवकाचे चित्रण आहे. हा युवक बारमध्ये वेटरचे काम करतो. तिथे असलेले इतर वेटर, बारबाला, हेल्पर, मोरीवाली बाई, वस्ताद, कॅप्टन आदींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे. बारबालांची तस्करी कशी केली जाते, याचे वास्तवही यातून मांडण्यात आलेले आहे.

टॅग्स :marathiमराठी