शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासांत तरुणाला तीन वेळा लुटले; चाकूचा धाक दाखवून ऑनलाइन पैसे उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:40 IST

वाहतूक पोलिसांनी दुपारी पकडलेल्या गुन्हेगाराचा त्याच दिवसातील दुसरा गुन्हा उघड झाला

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी मुकुंदवाडीत एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना ताजी असतानाच, त्याचदरम्यान ८ वाजता गारखेड्यात एका तरुणाला कुख्यात गुन्हेगार साईनाथ ऊर्फ पिन्या गणेश खडके (२२, रा. भारतनगर) याने हारुन रसूल शेख याच्यासह लुटले. दोघांनी धारदार चाकूने धमकावत ऑनलाइन सहा हजार रुपये लुटले. विशेष म्हणजे, याच गुन्हेगाराला दुपारी वाहतूक पोलिसांनी धारदार चाकूसह पकडले होते. यात खडकेला अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.

एका औषधी कंपनीत काम करणारा २५ वर्षीय ओंकार बाबासाहेब शिंदे (रा. गुरुदत्तनगर) हा दि. २ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कारगिल मैदानावर बसलेला होता. तेथेच बसलेल्या पिन्या, हारुनने त्याच्याकडे त्याची दुचाकी मागितली. ओंकारने त्याला नकार दिला. तेव्हा पिन्याने धमकावले होते. दि. ३ रोजी सकाळी ८ वाजता ओंकार भारतनगरमधून जात असताना पिन्याने त्याला गाठले. खिशातून मोठा चाकू काढून मारून टाकण्याची धमकी देत १० हजार रुपयांची मागणी केली. एकटाच असल्याने ओंकारने त्याला ५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले. हारुनने पुन्हा ३ हजार रुपये ऑनलाइन घेतले. त्यानंतर घाबरलेला ओंकार घरी गेला.

घर गाठत पुन्हा पैसे मागितलेओंकार घाबरल्याचे पाहून हारुनने पुन्हा दुपारी २ वाजता त्याचे घर गाठले. शस्त्राचा धाक दाखवून त्याला पुन्हा ७ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्या नकळत ओंकारने घरातून पळ काढत थेट पोलिस ठाणे गाठले. सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या सूचनेवरून पथकाने पिन्याला रात्री अटक केली.

हारुन पैसे मागत असताना पिन्या पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, पैसे घेऊन पिन्या बुधवारी दुपारी न्यायालयात गेला होता. तेथून बाहेर पडताच वाहतूक पोलिसांनी त्याला त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने पकडले. तेव्हा तो चाकूसह हाती लागला. त्याच वेळेला हारुन ओंकारच्या घरी पैसे मागायला गेला होता. क्रांतीचौक पोलिसांनी नोटीस देऊन सोडल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले. त्याच्यावर आतापर्यंत ६ गुन्हे असून, २०२३ मध्ये एमपीडीएअंतर्गत एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Robbed Thrice in Six Hours; Money Extorted at Knifepoint

Web Summary : A youth in Garkheda was robbed three times in six hours by criminals, including Sainath alias Pinya Khadke, who extorted money online at knifepoint. Khadke was arrested with a knife and is now in police custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर