येडशी येथे महिलेस कोयत्याने मारहाण
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:25:14+5:302014-06-27T00:27:40+5:30
उस्मानाबाद : शेतात काम करायचे नाही, शेत आम्ही घेतल्याचे म्हणत एका महिलेस कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास येडशी येथे घडली़

येडशी येथे महिलेस कोयत्याने मारहाण
उस्मानाबाद : शेतात काम करायचे नाही, शेत आम्ही घेतल्याचे म्हणत एका महिलेस कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास येडशी येथे घडली़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येडशी येथील सुवर्णा चव्हाण ही महिला पतीच्या नावे असलेल्या शेतात गुरूवारी दुपारी काम करीत होती़ त्यावेळी तेथे आलेल्या मुकुंद चव्हाण, सारिका चव्हाण यांनी तू या जमिनीत काम करायचे नाही, शेत आम्ही घेतले आहे असे म्हणत शिवीगाळ केली़ तर मुकुंद चव्हाण याने हातातील कोयत्याने तिस मारहाण करून जखमी केले़ याप्रकरणी जखमी सुवर्णा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ तपास सपोफौ हुंडेकरी हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
मोहा येथे ग्रामसेवकास शिवीगाळ, धमकी
उस्मानाबाद : अंगणवाडीला कुलूप लावल्याची विचारणा करणाऱ्या ग्रामसेवकाला शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मोहा येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली़ पोलिसांनी सांगितले की, मोहा येथील सुरेश जालिंदर काळे व काशीनाथ रामा काळे यांनी सोमवारी सकाळी गावातील अंगणवाडीला कुलूप लावले़ तसेच सार्वजनिक पाण्याचे बोअरचे किटकॅट काढून टाकले़ याबाबत ग्रामसेवक बी़पी़सोनवणे यांनी विचारणा केली़ त्यावेळी वरील दोघांनी सोनवणे यांना शिवीगाळ करीत धमकी दिली़ याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि खार्डे हे करीत आहेत़