शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:31 IST

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील हालचाली मंदावल्या आहेत. २०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्या वर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते; परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावे की नाही, यावरून प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिका-यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे. 

वेरूळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या वर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजनाचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते; परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दिवाळीनंतर महोत्सव घेण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले होते; परंतु दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

यापूर्वी आठ वेळा झाला नाही महोत्सव२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल परिसरात आयोजित करण्यात येऊ लागला. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमित होत गेला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला. दरम्यान महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे म्हणाले, प्रशासकीय पातळीवर महोत्सवाबाबत काहीही हालचाली नाहीत. 

या कारणांनी महोत्सव रद्द झाला - २००८- मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द - २००९- स्वाईन फ्लूची साथ आल्याने रद्द - २०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द - २०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द- २०१४- दुष्काळामुळे रद्द- २०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द- २०१७- नियोजन होऊ शकले नाही- २०१८- दुष्काळाच्या सावटामुळे रद्द होण्याची शक्यता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार