शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:38 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देउकाडा वाढला : पावसाची दडी अन् धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे.२० दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली. आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे.मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.