शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

By admin | Updated: May 28, 2014 00:40 IST

हिंगोली : कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी मंगळवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी अ‍ॅड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

हिंगोली : कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी मंगळवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी अ‍ॅड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे होते. उपअधीक्षक निलेश मोरे, पियुष जगताप, स्थागुशाचे पोनि संग्राम सांगळे, जिल्हा विशेष शाखेचे पोनि कारेगावकर, महेंद्र देशमुख यांच्यासह इतर अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. रेप व गँगरेपच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडित महिलेचा जवाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत हे काम करावे लागणार आहे. एखाद्या प्रकरणात उशीर झाल्यास विलंबाचे कारणही द्यावे लागणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अशी प्रकरणे चार्जशीट दाखल होईपर्यंत उघड करता कामा नये. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तातडीने नोंदवली जाण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन याच कार्यशाळेत पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी अधिकारी-कर्मचार्‍यांना ६ जूनपासून सुरू होणार्‍या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. ६७ जागांसाठी २ हजार २९५ अर्ज आले असून त्यामध्ये १ हजार ९५७ पुरूष तर ३३८ महिला उमेदवारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत पहिले चार दिवस कागदपत्रांची ढोबळ मानाने व सुक्ष्म तपासणी केली जाणार आहे. भरतीसाठी २५ मे २०१४ पुर्वीची प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत अधिकारी-कर्मचार्‍यांना ओळखपत्र बंधनकारक असून कुणालाही मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. एखाद्या कर्मचार्‍याचा नातेवाईक भरतीसाठी आला असेल तर त्याच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. तसेच अशा कर्मचार्‍यांना भरतीच्या ठिकाणाहून हटविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ६ ते २० जूनपर्यत चालणार असून पहिल्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी व उंची, छातीचे मोजमाप घेतले जाणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात चेस्ट क्रमांक देऊन उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)