प्रेस मशीनवर काम करताना कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:32+5:302021-07-18T04:04:32+5:30
वाळूज महानगर : प्रेस मशीनवर काम करताना एका कामगाराची तीन बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीत घडली. विजय कारभारी कनगरे ...

प्रेस मशीनवर काम करताना कामगार जखमी
वाळूज महानगर : प्रेस मशीनवर काम करताना एका कामगाराची तीन बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीत घडली. विजय कारभारी कनगरे (३१ रा. कदम वस्ती, वळदगाव) हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. ९ जुलै रोजी या कंपनीतील प्रेस मशीनवर काम करताना विजय कनगरे यांचा डावा हात मशीनमध्ये अडकून त्यांची तीन बोटे तुटली. या अपघातास कारणीभूत कंपनीमालक प्रमोद पाटील, सुपरवायझर विनोद चव्हाण व ठेकेदार सुरेश पवार या तिघांविरुध्द वाळूज एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------
द्वारकानगरीतून मोपेड लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरातील द्वारकानगरीतून मोपेड लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश रमेश विजयवर्गी हे पत्नी मोनिका यांच्या नावावर असलेली मोपेड (एमएच २० एफएच ८०५६) ये-जा करण्यासाठी वापरतात. ९ जुलै रोजी सायंकाळी महेश विजयवर्गीय यांनी ही मोपेड घरासमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही मोपेड चोरून नेली.
----------------------
प्रशांत मरकड यांची निवड
वाळूज महानगर : वाळूजच्या महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. प्रशांत मरकड यांची राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या गंगापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रा. मरकड यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
----------------------------