शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मजूर बनले कार्यकर्ते

By admin | Updated: September 28, 2014 01:03 IST

औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-२ परिसरातील कामगार चौक. वेळ - सकाळी १० वाजेची. एरव्ही हा चौक कामाच्या शोधात उभ्या असलेल्या शेकडो मजुरांनी गजबजलेला असतो. आज मात्र चौकात शुकशुकाट जाणवत होता.

औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-२ परिसरातील कामगार चौक. वेळ - सकाळी १० वाजेची. एरव्ही हा चौक कामाच्या शोधात उभ्या असलेल्या शेकडो मजुरांनी गजबजलेला असतो. आज मात्र चौकात शुकशुकाट जाणवत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एक जणाकडे सहज चौकशी केली ‘आज गर्दी का नाही रे बाबा, कुठे गेले कामगार’. पटकन तो उत्तरला ‘साहेब, इलेक्शन सुरू आहे ना, समदे गेले मिरवणुकीला, म्या उशिरा आलो म्हणून मला रोजीरोटीसाठी थांबावे लागले.’ विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, शनिवारी बहुतांश उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला. एरव्ही ठिकठिकाणच्या कामगार चौकात मजूर मोठ्या प्रमाणात उभे असतात; पण आज सर्व कामगार चौक ओस पडले होते. यात सिडको एन-२ येथील कामगार चौक, पीरबाजारातील कामगार चौक, शहागंजातील चौकात हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. अनेक कामगारांना सकाळीच मिरवणुकीत नेण्यात आले होते, त्यांनी कार्यकर्ते म्हणून कार्य केले. निवडणुकीचे दिवस म्हणजे मजुरांसाठी सुगीचे दिवस ठरत आहेत. जे कामगार उशिरा आले त्यांना मात्र, बांधकाम ठेकेदारांची प्रतीक्षा करावीलागली. सिडको, सिडकोतील कामगार चौकात सुभाष जोगदंडे नावाच्या मजुराने सांगितले की, यंदा समदे पक्ष स्वतंत्र लढणार आहेत म्हणे, याचा फायदा बी आम्हाला होईल. पीरबाजारातील चौकात मजुरांची कमी संख्या का, असा प्रश्न एका मजुराला विचाराला तेव्हा त्याने अनेक जण विविध पक्षांच्या मिरवणुकीत गेल्याचे सांगितले. एका मजुराने सांगितले की, आता निवडणूक संपेपर्यंत चौकात मजुरांची संख्या कमीच दिसेल. मात्र, असेही काही मजूर आहेत की, ते निवडणूक प्रचारात जात नाहीत, ते बांधकामाचे काम करतात.