संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा माहितीपटामुळे जगभर प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST2021-06-16T04:06:31+5:302021-06-16T04:06:31+5:30
नेवासे(जि. अहमदनगर) येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृकश्राव्य स्वरूपातील माहितीपटाचे प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबासमोर शिवाजी महाराज देशमुख यांनी संगणकाचे बटन ...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा माहितीपटामुळे जगभर प्रसार
नेवासे(जि. अहमदनगर) येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृकश्राव्य स्वरूपातील माहितीपटाचे प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबासमोर शिवाजी महाराज देशमुख यांनी संगणकाचे बटन दाबून केले. यावेळी ते बोलत होते. या माहितीपटाचे संहितालेखन, निवेदन आणि संपादन कायगाव येथील राहुल कुलकर्णी यांनी केले आहे. नेवासे येथील ज्ञानेश्वरांनी केलेला कर्मयोग, या रचना स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व, पैस खांबाचे महत्त्व आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रचनेचा इतिहास या माहितीपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोदा- प्रवरा संस्कृतीवर या माहितीपटाद्वारे प्रकाश पडणार आहे. संत ज्ञानेश्वरांचे कर्मभूमी असलेल्या ठिकाणाचा या माहितीपटाद्वारे यूट्यूबवर जगभर प्रसार होणार असल्याबद्दल संस्थानतर्फे समाधान व्यक्त करण्यात आले. यासाठी राजीव जाधव, दीपक बिरुटे आणि रामचंद्र बिरूटे यांनी छायाचित्रीकरण केले आहे. यावेळी गुरुप्रसाद देशपांडे, नितीन कुलकर्णी, राजेश जगताप, आशिष कावरे, शिवाजी होन, भाऊराव सोमवंशी आदींची उपस्थिती होती.
फोटो : येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृकश्राव्य स्वरूपातील माहितीपटाचे प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबासमोर शिवाजी महाराज देशमुख यांनी संगणकाचे बटन दाबून केले.