शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१० वर्षांची प्रतीक्षा संपणार ! नवीन पाणी योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:52 IST

मागील १० वर्षांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. 

ठळक मुद्दे१६८० कोटींच्या योजनेला अंतिम मंजुरीजायकवाडी ते नक्षत्रवाडी लवकरच सर्वेक्षण

औरंगाबाद : वर्ष सरतांना महाराष्ट्र शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी दिल्याची गोड बातमी औरंगाबादकरांसाठी मंगळवारी येऊन धडकली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महिनाभरात योजनेचे भूमिपूजन होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काम सुरू करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु केली. मागील १० वर्षांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. 

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युती सरकारने अवघ्या ५५ दिवसांमध्ये १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया राबविली. निविदा प्रक्रियेत हैदराबादच्या जीव्हीपीआर कंपनीने ९.९ टक्के अधिक दराने निविदा दाखल केली. इतर कंपन्यांच्या तुलनेत जीव्हीपीआरने दर कमी होते. त्यामुळे या कंपनीच्या निविदेला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव मजीप्राने राज्य शासनाकडे लॉकडाऊन पूर्वी सादर केला होता. कोरोना संसर्ग आणि त्यानंतर मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही संचिका पडून होती. राज्य शासनाने मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी दिली. अर्थ विभागाने निधीच्या अनुषंगाने अध्यादेशही काढला. त्यामुळे योजनेतील सर्व अडथळे दूर झाले.   

कंपनी २६ कोटी १६ लाख डिपॉझिट भरणारयोजनेला मंजुरी मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जीव्हीपीआर कंपनीला २६ कोटी १६  लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे पत्र पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. नियमानुसार कंपनीला २ टक्के अनामत रक्कम भरावी लागते. ही प्रक्रिया दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

आयुक्तांनी सोडली मॅच वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी महापालिका प्रशासन गरवारे क्रीडा संकुलावर क्रिकेटचा सामना खेळत होते. यावेळी पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे शासनाकडून त्यांना कळाले. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील प्रक्रियेसाठी भेट घेण्यासाठी आयुक्त मॅच सोडून निघून गेले.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी लवकरच सर्वेक्षणजायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात येणाऱ्या मोठ्या जलवाहिनीसाठी युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू करण्यात येईल. जलवाहिनीसाठी कोणकोणत्या ठिकाणी लेव्हल उपलब्ध आहे, याची तपासणी करण्यात येईल. जलवाहिनी टाकण्यासाठी कुठेही भूसंपादन करण्याची गरज नाही. - अजय सिंग, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका