शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

‘ब्लॅक लिस्ट’ला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:12 IST

महापालिकेने शहरातील ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम वाळूज येथील ज्या ‘मायोवेसल’ कंपनीला दिले आहे, त्या कंपनीला अमरावती महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी ब्लॅक लिस्ट केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय ‘मायोवेसल’ला कचºयावर दोन वर्षे प्रक्रिया केल्याचा अनुभव नसतानाही महापालिका आणि इंदूरच्या प्रकल्प सल्लागार समितीने कंपनीची निवड केलीच कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादच्या कचऱ्यावर प्रक्रिया : इंदूरच्या ‘पीएमसी’ची भूमिका संशयास्पद

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने शहरातील ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम वाळूज येथील ज्या ‘मायोवेसल’ कंपनीला दिले आहे, त्या कंपनीला अमरावती महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी ब्लॅक लिस्ट केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय ‘मायोवेसल’ला कचºयावर दोन वर्षे प्रक्रिया केल्याचा अनुभव नसतानाही महापालिका आणि इंदूरच्या प्रकल्प सल्लागार समितीने कंपनीची निवड केलीच कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.शहरातील ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम वाळूज येथील ‘मायोवेसल’ या कंपनीने घेतले आहे. या कंपनीला कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीनचा पुरवठा करण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र, महापालिकेच्या अटी-शर्थींनुसार दोन वर्षे कचºयावर प्रक्रिया केल्याचा अजिबात अनुभव नसल्याचे कंपनीने महापालिकेला सादर केलेल्या कागदपत्रांमधून समोर येत आहे.चिकलठाणा आणि पडेगाव येथे १५० मेट्रिक टनचे दोन प्रकल्प महापालिका उभारणार आहे. दोन्ही कचरा प्रक्रिया केंद्रांवर दररोज ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल, यादृष्टीने निविदा प्रसिद्ध केली. दिल्ली येथील अल्फाथेम, हैदराबाद येथील हायक्यूब, औरंगाबाद येथील मायोवेसल या तीन कंपन्यांनी निविदा भरली. मशीन पुरवठ्यासह पाच वर्षे कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दिल्लीच्या अल्फाथेम कंपनीने ३४ कोटी रुपयांची निविदा भरली. हायक्यूबने २१ कोटी, तर औरंगाबादच्या मायोवेसलने १८ कोटींमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शविली.महापालिकेने दोन दिवसांपूर्वी सर्वांत कमी दर आलेल्या औरंगाबादच्या वाळूजमधील कंपनीची निवड करून टाकली. दोन दिवसांत कंपनीला वर्कआॅर्डरही देण्याची लगबग सुरू असतानाच महापालिकेने चुकीच्या कंपनीला काम दिल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे झाली आहे.मनपाने डोळे मिटून दिले काममहापालिकेने निविदेत अनेक अटी-शर्थी टाकल्या होत्या. या अटींचे उल्लंघन प्रशासन आणि ‘इको प्रो’ या प्रकल्प सल्लागार समितीने केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. ‘मायोवेसल’ कंपनीला दोन वर्षे कचºयावर प्रक्रिया करण्याचा अनुभव नाही.बंगळुरू, नांदेड, अमरावती या महापालिकांमध्ये कंपनीने घनकचºयाचे प्रकल्प रखडवून ठेवले आहेत. अमरावती मनपाने तर कंपनीला चक्क ब्लॅकलिस्ट केले आहे. कंपनीने आपली वार्षिक उलाढाल ३ कोटी ७४ लाख रुपये असल्याचे दर्शविले आहे. एका लेखापरीक्षकाच्या (सी.ए.) पत्रावर हा आकडा दिला आहे. त्याचा विस्ताराने तपशील देण्यात आला नाही.देशात एखादा प्रकल्प यशस्वी केल्याचे प्रमाणपत्र (वर्क डन) कंपनीकडे नाही. कंपनीने मनपाकडे लेखी स्वरूपात आम्ही कुठेच गैरव्यवहार अथवा फसवणूक केलेली नसल्याचे म्हटले आहे.ओडिशा, तामिळनाडू राज्यांत तसेच मध्यप्रदेशातील उज्जैन, कर्नाटकातील बंगळुरू, केरळमधील कोचीन आणि राज्यातील नवी मुंबई आदी महापालिकांमध्ये ‘वर्क अंडर प्रोसेस’ (काम सुरू आहे), असे कंपनीनेच औरंगाबाद महापालिकेला लिहून दिले आहे. ही सर्व कामे दोन ते तीन वर्षांपूर्वी कंपनीने घेतली आहेत. आजपर्यंत प्रकल्प सुरू का झाले नाहीत, असा साधा-सोपा प्रश्न महापालिकेच्या तज्ज्ञ अधिकाºयांना पडलेला नाही.७० टक्के निधी दोन महिन्यांतचिकलठाणा, पडेगाव येथे ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करणाºया कंपनीला ‘वर्क आॅर्डर’ दिल्यानंतर दोन महिन्यांत ७० टक्केरक्कम मिळेल, असे निविदेत म्हटले आहे. एकदा कंपनीला निधी दिल्यावर प्रकल्प रखडल्यास महापालिका काहीच करू शकणार नाही. परत शासनाकडे निधी मागण्यासाठी मनपाला तोंडही राहणार नाही. अशा परिस्थितीत निविदेत ही अट कशी घालण्यात आली, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.कचराकोंडीमुळे शहरातील नागरिक त्रस्त असतानाही महापालिका यासंदर्भात जी पावले टाकत आहे तिला पाठिंबा देण्याचे काम अनेक नागरिक, उद्योजक, त्यांच्या संघटना करीत असताना महापालिकेकडून मात्र ‘ब्लॅक लिस्टेड’ आणि कचराप्रक्रियेचा अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिल्याने एक प्रकारे ही जनतेची फसवणूकच ठरणार आहे.‘पीएमसी’चे कोट्यवधी रुपये कशासाठीघनकचरा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यासाठी राज्य शासनाने इंदूर येथील ‘इको प्रो’ या संस्थेची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नेमणूक केलेली आहे. घनकचºयातील प्रकल्प आराखडा याच संस्थेने तयार केला आहे. निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी करणे, योग्य कंपनीची शिफारस करण्याचे कामही संस्थेकडेच आहे.या कामासाठी महापालिका कंपनीला कोट्यवधी रुपये अदा करीत आहे. संस्थेने शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पातच सावळा गोंधळ करून ठेवला आहे. असा गोंधळ करण्यासाठी महापालिकेने ‘इको प्रो’ला रक्कम दिली आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका