शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: December 17, 2014 00:00 IST

गंगापूर : शहरवासियांना भयमुक्त करावे, या मागणीसाठी शहरातील महिला व शालेय विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा नेला. त्यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांना निवेदन दिले.

गंगापूर : गंगापूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीस कठोर शासन व्हावे, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखून शहरवासियांना भयमुक्त करावे, या मागणीसाठी शहरातील महिला व शालेय विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा नेला. त्यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांना निवेदन दिले.हा मोर्चा प्रगती कॉलनीपासून सुरू झाला. शिवाजी चौक, आंबेडकर चौकमार्गे मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मोर्चा पुढे जात असताना महिला यात सहभागी होत गेल्या. १२ डिसेंबर रोजी गंगापूर शहरातील गोदावरी कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भरदुपारी १ वाजेदरम्यान अंबेवाडी येथील बाळू जगन्नाथ आळंजकर याने सदर तरुणीच्या घरात वाईट हेतूने प्रवेश केला. तरुणीने त्यास विरोध केला असता त्याने आपल्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने तरुणीच्या अंगावर वार करून जखमी केले. नराधम तरुण एवढ्यावरच न थांबता दगडानेही तरुणीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील महाविद्यालयीन व शाळकरी मुली-महिला धास्तावल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी बाळू आळंजकर याला अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यास १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.सदर घटनेचे पडसाद शहर व परिसरात उमटले. हा मोर्चा नगरसेविका सुवर्णा जाधव, बिजला साबणे, मंदाबाई खाजेकर, आशाबी मन्सुरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. गंगापूर शहरातील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात सरिता सुंब, डॉ. वर्षा गायकवाड, अंजली राजपूत, सविता चोरमारे, शोभा गवारे, सविता वाघचौरे, मंजिरी भाले, पूजा रहाटवाड यांच्यासह धूत कन्या प्रशाला, श्री मुक्तानंद महाविद्यालयामधील विद्यार्थिनींनी सहभाग होता.