शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

महिलेचा मांजाने कापला गळा, चार तास शस्त्रक्रिया, ४० टाके अन् लागली एक रक्ताची पिशवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:54 IST

दुचाकीचालकच नव्हे, पाठीमागे बसलेल्यांनाही मांजाचा धोका

छत्रपती संभाजीनगर : नायलाॅन मांजाने जखमी होण्याच्या घटना सुरूच असून, पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा गळा कापला गेल्याची घटना रविवारी सायंकाळी मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात घडली. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. गळ्याला तब्बल ४० टाके द्यावे लागले. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची एक पिशवीही लागली.

विजया संजय पाटील (४९, रा. म्हाडा काॅलनी, एन-२ ) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या पतीसह रविवारी सायंकाळी दुचाकीवरून क्रांती चौकाकडे जात होत्या. मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात अचानक मांजा आला आणि काही कळण्याच्या आतच विजया यांचा गळा कापला गेला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजामुळे गंभीर जखम झाली होती. गळ्याच्या छोट्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू झाली. रात्री ११ वाजेच्या सुमारास ती पूर्ण झाली. सुमारे ४० टाके व रक्ताची एक पिशवीही द्यावी लागली. डाॅ. नीलेश तायडे, डाॅ. गणेश लहाने, डाॅ. देवेंद्र लोखंडे, डाॅ. जयेश टकले यांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती डाॅ. विनोद चावरे यांनी दिली.

फक्त मांजा नव्हे, पतंग उडविण्यावरच बंदी हवीफक्त मांजावरच नव्हे, तर पतंग उडविण्यावरच बंदी आणली पाहिजे. विजया या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या होत्या. दुचाकी चालविताना समोर अचानक मांजा आल्याने त्या जखमी झाल्या. माझ्याही हाताच्या बोटाला मांजाने जखम झाली.- संजय पाटील, जखमी महिलेचे पती

मांजाने गळ्यापासून मानेपर्यंत जखम, ३५ टाकेदुसऱ्या एका घटनेत मांजामुळे एका १९ वर्षीय तरुणाच्या गळ्यापासून तर मानेपर्यंतचा भाग कापला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौक परिसरात घडली. या जखमेला तब्बल ३५ टाके द्यावे लागले. शेख फरदीन (रा. दौलताबाद) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कामानिमित्त शेख फरदीन हा सोमवारी सायंकाळी दुचाकीवर टीव्ही सेंटर चौक परिसरातून जात होता. मांजा अडकल्यामुळे त्याच्या गळ्यापासून तर मानेपर्यंतचा भाग कापला गेला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जखमेला ३५ टाके द्यावे लागले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी