थाप मारून सोनाराला गुंगारा देणारी महिला अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:45 IST2019-03-12T23:45:43+5:302019-03-12T23:45:58+5:30
रिक्षात बसलेल्या आजारी नवऱ्याला सोन्याचे दागिने दाखवून परत येते, अशी थाप मारून शिवाजीनगरातील दुकानातून सुवर्णलंकार घेऊन पसार झालेल्या महिलेला गुन्हे शाखेने संजयनगरात जेरबंद केले.

थाप मारून सोनाराला गुंगारा देणारी महिला अखेर अटक
औरंगाबाद : रिक्षात बसलेल्या आजारी नवऱ्याला सोन्याचे दागिने दाखवून परत येते, अशी थाप मारून शिवाजीनगरातील दुकानातून सुवर्णलंकार घेऊन पसार झालेल्या महिलेला गुन्हे शाखेने संजयनगरात जेरबंद केले.
शबाना फेरोज शेख, असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, तिने ११ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगरातील सोन्याच्या दुकानात जाऊन जुनी पोत विकून नवीन दागिने खरेदी करायचा बहाणा केला होता. दुकानातून सोन्याचे पदक, तीन अंगठ्या घेतल्या व आजारी नवऱ्याला दाखवून येते, असे सांगून ती दुकानातून बाहेर आली. दुकानदाराने तिला रोखले, तेव्हा जाताना तिने तिची सोन्याची पोत दुकानदाराकडे दिली. खूप वेळ होऊनही ती परत न आल्याने दुकानदाराने पोत निरखून पाहिली तेव्हा ती नकली असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून दुकानदाराने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.