रेल्वेच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:05 IST2019-05-26T22:05:15+5:302019-05-26T22:05:25+5:30
रेल्वेच्या धडकेने महिला ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर कुंभेफळ फाट्याजवळ घडली.

रेल्वेच्या धडकेने महिला ठार
करमाड : रेल्वेच्या धडकेने महिला ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर कुंभेफळ फाट्याजवळ घडली. शिलाबाई बाबुराव गायकवाड (३५रा. कुंभेफळ ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी सांगितले की, औरंगाबाद-जालना मार्गावर कुंभेफळ फाट्याजवळ रविवारीसायंकाळी साडेसहा वाजता रेल्वेच्या धडकेने शिलाबाई गायकवाड जागीच ठार झाली. प्राथमिक माहितीनुसार या महिलेने आत्महत्या केली असल्याचे सुतळे यांनी सांगितले. या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली.