नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:55 IST2023-03-19T16:53:54+5:302023-03-19T16:55:58+5:30
योगायोगाने त्याच ट्रेनमधून महिला डॉक्टर प्रवास करत होत्या, त्या मदतीला धावल्या.

नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...
संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये रविवारी एका महिलेची प्रसूती झाली. यावेळी योगायोगाने रेल्वेत असलेली एक महिलाडॉक्टर आणि इतर महिला प्रवासी मदतीसाठी धावून आले. त्यांनीच रेल्वेमध्ये त्या महिलेची प्रसूती केली. बाळ आणि आई सुखरुप, दोघेही सुखरुप आहेत.
नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप... pic.twitter.com/k8HrL0dpr5
— Lokmat (@lokmat) March 19, 2023
जालना रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हा रेल्वेत कोणी डॉक्टर आहे का, याची शोधाशोध करण्यात आली. योगायोगाने नांदेड येथील डॉ. अश्विनी इंगळे या रेल्वेत होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. डॉ. इंगळे आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली. बाळ आणि आई सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांची धडपड
रेल्वेतील टीसी राकेशकुमार मीना, आभिषेककुमार यांनी महिलेला मदत मिळवून देण्यासाठी धडपड केली. प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर रेल्वेची यंत्रणा मदतीसाठी सज्ज झाली होती. परंतु त्यापूर्वीच रेल्वेत डॉक्टर आणि महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली.