महिलेला फाशी घेण्यास भाग पाडले
By Admin | Updated: December 24, 2014 01:04 IST2014-12-24T00:34:05+5:302014-12-24T01:04:04+5:30
औरंगाबाद : पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून एका महिलेला तिच्याच घरात तरुणाने फासावर लटकावून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नबाबपुऱ्यात घडली.

महिलेला फाशी घेण्यास भाग पाडले
औरंगाबाद : पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून एका महिलेला तिच्याच घरात तरुणाने फासावर लटकावून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नबाबपुऱ्यात घडली. फासावर लटकताच तिच्या चिमुकल्याने आक्रोश सुरू केला. तेव्हा शेजारीपाजारी धावत आल्यामुळे सुदैवाने ही महिला बालंबाल बचावली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या महिलेच्या तीन वर्षीय मुलाला जमिनीवर आपटून ठार मारण्याची धमकी देत तिला फासावर लटकण्यास भाग पाडले होते.
हे कृत्य करणाऱ्या शेख शाकीर (रा. दादा कॉलनी) याला सिटीचौक पोलिसांनी काल अटक केली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नबाबपुऱ्यातील रहिवासी असलेल्या छाया चौधरी या महिलेच्या पतीने गेल्या वर्षी आरोपी शेख शाकीरविरुद्ध पोलीस ठाण्यात पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. त्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आता आरोपी शाकीरला परदेशात जायचे होते. त्यासाठी त्याला पासपोर्ट काढायचा आहे; परंतु त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने पासपोर्ट काढण्यास अडचण येत आहे. जोपर्यंत आपल्याविरुद्धची तक्रार छाया चौधरी यांचे पती मागे घेत नाही, तोपर्यंत पासपोर्ट मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने चौधरी दाम्पत्याला त्रास देण्यास सुरुवात केली.
धमकाविल्यानंतरही हे दाम्पत्य तक्रार मागे घेण्यास काही तयार होईना. त्यामुळे संतापलेला शाकीर १० डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सरळ चौधरी यांच्या घरी दाखल झाला. त्यावेळी छाया आणि तिचा तीन वर्षीय मुलगा घरी होते.
छायाला शाकीरने ‘पतीला तक्रार मागे घेण्यास सांग’ असे धमकाविले. तिने नकार देताच आरोपीने घराचा आतून दरवाजा बंद केला व तिला धमकावीत चक्क फाशी घेण्यास भाग पाडले.
चिमुकल्याच्या आक्रोशामुळे...
आपल्या आईला फासावर लटकाविल्याचे पाहताच तिच्या तीनवर्षीय मुलाने आक्रोश सुरू केला. आरडाओरड ऐकून शेजारीपाजारी धावत आले; परंतु आतून दरवाजा बंद होता. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला.