शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मंगळसूत्राला हात घालताच चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; महिलेच्या धाडसाने सराईत गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 7:04 PM

मंगळसूत्र ओरबाडताच महिलेने चोरट्याचा शर्ट पकडून ठेवला; नागरिकांनी चोप देत दिले पोलिसांकडे

वाळूज महानगर : मोबाइलवर बोलत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. या महिलेने धाडस दाखवून चोरट्याला पकडल्यानंतर, मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी रात्री बजाजनगरात घडली.

भारत राजू गेडवे (२५ रा.वडगाव) असे मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. पुष्पा विजय निकम (४० रा.एस.टी.कॉलनी, बजाजनगर) या शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोबाइलवर बोलत घरासमोरील रस्त्यावर फेरफटका मारत होत्या. एका संशयित तरुणाने दोन-तीनदा पुष्पा निकम यांच्यासमोरून चकरा मारल्या. मात्र, मोबाइलवर बोलण्यात त्या गुंग असल्याची संधी साधून, त्याने त्यांच्याजवळ जात, त्यांना एक झापड मारून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला. निकम यांनी चोरट्याचा शर्ट घट्ट पकडून ठेवला. झटापटीत चोरट्याने निकम यांना खाली पाडून लाथा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. निकम यांनी आरडाओरडा केल्याने संतोष शिंदे, शुभम रक्ताटे, मयूर निकम, पं.स. सदस्य सतीश पाटील यांनी मदतीसाठी येत पाठलाग करून करून चोरास पकडले.

पोलिसांच्या स्वाधीननागरिकांनी चोरट्यास पकडून चौकशी केली असता, त्याने ‘माझ्या नादी लागू नका, मला सोडा, नाहीतर तुमचा मर्डर करीन,’ असे धमकावले. मात्र, संतप्त जमावाने चोप देऊन त्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपले नाव भारत राजू गडवे (२५ रा.वडगाव कोल्हाटी) असल्याचे सांगितले. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खुनासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पुष्पा निकम यांच्या फिर्यादीवरून भारतविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक ए.आर. इंगोले हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद