शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकाविना रोकडे नेणारे दोघे पकडले

By admin | Updated: September 17, 2015 00:32 IST

बीड: एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दुचाकीवर २१ लाख रुपयांची रोकड चक्क दुचाकीवरुन व विना सुरक्षा रक्षकाशिवाय घेऊन जाणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी

बीड: एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दुचाकीवर २१ लाख रुपयांची रोकड चक्क दुचाकीवरुन व विना सुरक्षा रक्षकाशिवाय घेऊन जाणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडले. चौकशी अंती त्या दोन व्यक्तींना पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे पाटील यांनी तंबी देऊन सोडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व एटीएममशीनमध्ये पैसे भरण्याचे कंत्राट एका कंपनीस देण्यात आले आहे. त्या कंपनीचे कर्मचारी बँकेतून लाखो रुपयांची रोकड घेतात. चार चाकी वाहनात दोन कर्मचारी व एक बंदुकधारी गार्डही सोबत असतो. दरम्यान, या कंपनीचे वाहन बुधवारी परळी येथे गेले होते. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने एका बँकेत जाऊन १२ लाख रुपयांची रोकड घेतली तर दुसऱ्याने इतर एका बँकेतून ९ लाख ५४ हजार ४८३ रुपये एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये टाकण्यासाठी घेतले. हे सर्व पैसे एका थैलीमध्ये भरले. १२ लाख रुपयांची रक्कम बार्शी रोडवरील एक बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी ते दोघे दुचाकीवरुन निघाले होते. त्यावेळी शिवाजी नगर पोलीस ठाणा परिसातून जात असताना त्यांचा संशय वाहतुक पोलिसास आला. त्यामुळे त्यांनी याबाबत त्या दोन वक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी थैलीमध्ये पैसे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)विना सुरक्षा दुचाकीवर २१ लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना एका बँकेच्या अधिकारी व सुरक्षा एजन्सीची चौकशी उपविभागीय अधिकारी गणेश गावडे पाटील यांनी अधीक्षक कार्यालयात केली. याबाबत त्यांच्याकडील संपुर्ण रकमेबाबतची विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली. यापुढे अशा प्रकारे, बेजबाबदारपणे ऐवढीमोठी रोकड घेऊन जाऊ नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी तंबी त्यांना देण्यात आली.