अवघ्या पंधरा मिनिटांत एसबीआयचे एटीएम सेंटर रोख रक्कमेसह जळून खाक
By सुमित डोळे | Updated: September 8, 2023 19:52 IST2023-09-08T19:50:07+5:302023-09-08T19:52:09+5:30
कटकट गेट परिसरातील पेट्रोलपंपापासून २०० मिटर अंतरावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे.

अवघ्या पंधरा मिनिटांत एसबीआयचे एटीएम सेंटर रोख रक्कमेसह जळून खाक
छत्रपती संभाजीनगर : अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आगीने वेढलेले एसबीआयचे एटीएम सेंटर जळून खाक झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. रात्री उशीरापर्यंत एटिएमचे काम सांभाळणाऱ्या एजन्सीने पोलिस, अग्निशमनकडे तक्रार न दिल्याने एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम किती होती, हे मात्र कळू शकले नाही.
कटकट गेट परिसरातील पेट्रोलपंपापासून २०० मिटर अंतरावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सेंटर मधून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेईपर्यंत सेंटरला आगीने वेढले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे सिडको इंचार्ज सोमीनाथ भोसले, जवान आकाश नेरकर, अजिंक्य भगत, अब्दुल वासे, अशोक वेलदौडे, नंदू घुगे यांनी धाव घेतली. एका बंबाच्या सहाय्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.