शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित

By सुमेध उघडे | Updated: October 28, 2024 19:08 IST

ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले. 

छत्रपती संभाजीनगर: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना उद्धवसेनेच्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मतदारसंघासाठी उद्धवसेनेने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. 

शहरातील मध्य मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली. मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन तनवाणी यांनी अचानक निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. या धक्क्यातून सावरत उद्धवसेनेने तत्काळ दूसरा उमेदवार घोषित केला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. थोरात हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे शहरप्रमुख असून माजी नगरसेवक आहेत.

तनवाणी यांना केले पदमुक्तऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे यावेळी दानवे यांनी जाहीर केले. 

तनवाणी काय नेमंक म्हणालेप्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. त्यानंतर सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. तसेच आता २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक