'तुमच्या मुलीस पळवून नेईल';एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस त्रास देणारा तरुण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:11 IST2020-03-05T19:08:48+5:302020-03-05T19:11:49+5:30
मुलीच्या आई वडिलांना शिवीगाळ करून दिली धमकी

'तुमच्या मुलीस पळवून नेईल';एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस त्रास देणारा तरुण अटकेत
सिल्लोड : शहरात नववी वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीस बळजबरी मोबाईल देऊन स्वीकारण्यास दबाव आणणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणास पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. सैयद मोईन सैयद अजीम सोफियांन (१९, रा.जैनोद्दीन कॉलनी सिल्लोड ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो मागील दीड वर्षांपासून या अल्पवयीन मुलीस त्रास देत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या एका मुलीस सैयद मोईन सैयद अजीम सोफियां या मागील दीड वर्षांपासून एकतर्फी प्रेमातून त्रास देत आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी अनेकदा समजावले तरीही त्याचा त्रास कमी होत नव्हता. उलटे तरुणाने मुलीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून तिला पळवून नेण्याची धमकी दिली. यानंतर मुलीस मोबाईल गिफ्ट घेण्यासाठी दबाव आणला. सातत्याने होणार्या या त्रासाला कंटाळून अखेर मुलीच्या वडिलांनी तरुणाविरुद्ध शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली. यावरून बालकांचे लैगिक अत्याचार, कलम ८,१२ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणास अटक केली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे करत आहे.