शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

गॅस्ट्रोने हाहाकार उडण्याची प्रशासन वाट पाहतेय का...?; औरंगाबाद मनपात नगरसेवकांचा संतप्त प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 1:45 PM

शहरातही गॅस्ट्रोसारखी साथ पसरून हाहाकार उडावा याची वाट प्रशासन बघतेय का...? असा संतप्त सवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून शहरात दूषित पाणीपुरवठादूषित पाण्यामुळे छावणीत गॅस्ट्रोची साथ पसरली. रुग्णांचा आकडा चार हजारांपर्यंत गेला.पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आठ दिवसांचे आणि शेवटचे अल्टिमेटम महापौरांनी अधिका-यांना दिले.

औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे छावणीत गॅस्ट्रोची साथ पसरली. रुग्णांचा आकडा चार हजारांपर्यंत गेला. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये परिस्थिती खूप चांगली नाही. विविध वसाहतींना तब्बल सहा ते आठ महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होतोय. शंभर तक्रारी केल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी अजिबात दखल घेत नाहीत. शहरातही गॅस्ट्रोसारखी साथ पसरून हाहाकार उडावा याची वाट प्रशासन बघतेय का...? असा संतप्त सवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आठ दिवसांचे आणि शेवटचे अल्टिमेटम महापौरांनी अधिका-यांना दिले.

सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर चर्चा घेण्याचे निश्चित होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील समस्यांचा पाढाच वाचायला सुरुवात केली. नगरसेविका माधुरी अदवंत यांनी तर वॉर्डात पन्नास मिनिटे पाणी न आल्यास मनपासमोर उपोषण करण्याचे जाहीर करून टाकले. जुन्या शहरात पाण्याची अधिक बोंबाबोंब असल्याने शहागंज येथे पाणी साठविण्यासाठी नवीन हौद बांधण्यात यावा, अशी मागणी सरवत बेगम यांनी केली. अज्जू नाईकवाडी यांनी एन-५ पाण्याच्या टाकीला छत नसल्याने पाण्यासोबत कबुतर व इतर पक्ष्यांचे पंख येत असल्याचे नमूद केले. 

शिल्पाराणी वाडकर यांनी पाण्याच्या टाक्या भरत नसल्याची तक्रार केली. हाजी इर्शाद यांनी वॉर्डात ड्रेनेजचे दूषित पाणी सहा महिन्यांपासून येत असल्याची तक्रार केली. सीमा खरात, सीमा चक्रनारायण, बन्सी जाधव यांनी पाणी प्रश्न मांडला. रेश्मा कुरैशी यांनीही दूषित पाण्याची तक्रार केली. राज वानखेडे यांनी हर्सूल भागात पाण्याची टाकी बांधून तलावाचे पाणी या भागातील वॉर्डांना द्या, कीर्ती शिंदे यांनी जायकवाडीहून जास्त पाणी आणण्यासाठी नियोजन करण्याची सूचना केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी येणाºया आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा, दूषित पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावावा, असे आदेश कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना दिले.

घाटीमध्ये गॅस्ट्रोच्या २० रुग्णांवर उपचारशासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल अर्थात घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत गॅस्ट्रोच्या २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रत्येक महिन्याला रुग्णालयात सरासरी २० ते २५ रुग्ण दाखल होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. छावणी परिसरातील हजारो लोकांना एकाच वेळी गॅस्ट्रोची लागण झाली. या भागातील रुग्णांनी छावणी सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यावर भर   दिला. उपचारासाठी या भागातून रुग्ण घाटीत आले नाहीत; परंतु २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण अन्य भागातील असल्याची   माहिती  घाटीतर्फे देण्यात आली. घाटीत प्रत्येक महिन्याला गॅस्ट्रोचे किमान २० रुग्ण दाखल होतात.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका