डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

By Admin | Updated: May 24, 2014 02:07 IST2014-05-24T01:59:43+5:302014-05-24T02:07:44+5:30

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या नवर्‍याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची

Wife's blood on stone | डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या नवर्‍याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील विश्रांतीनगर येथे घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबिता रामदास बेदवे (२९, रा. विश्रांतीनगर, गल्ली नं. १) असे मयत पत्नीचे नाव आहे. मारेकरी रामदास छोटूलाल बेदवे (३१, रा. विश्रांतीनगर) हा मयत बबिताचा पती आहे. तो मजुरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. मयत बबिता ही धुणे-भांडी करून संसार चालवायची. तिला आकाश (६) व अरुण (८) अशी दोन मुले आहेत. काल रात्री आईच्या घरी बबिता व रामदासने जेवण केल्यानंतर ते आपल्या घरी निघून गेले. मोठा मुलगा अरुण हा आजीकडेच राहतो. बबिताच्या आईने तिच्या शेजारीच पत्र्याचे शेड करून मुलगी व जावयाला राहण्यासाठी घर दिले होते. ४-५ वर्षांपासून ते तेथेच राहतात. रामदास बेदवे हा संशयी वृत्तीचा आहे. यापूर्वीही त्याने बबिताला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतले होते. यासंबंधी त्याच्याविरुद्ध सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही दिवसांनंतर त्यांच्यात तडजोड झाली व ते औरंगाबादेत राहायला आले. येथेही तो बबिताच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करायचा. काल रात्री झोपतानाही त्यांच्यात वाद झाला. बबिताच्या पश्चात वृद्ध आई, विधवा मोठी बहीण व भाऊ असा परिवार आहे. भाऊ २५ वर्षांचा आहे; पण त्याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. तेव्हापासून त्याची स्मृती गेली आहे. बहीण विधवा असून, तिला एक मुलगा आहे. बबिताला दोन मुले आहेत. त्या दोन्ही मुलांचे संगोपन कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजी किंवा मावशी किती दिवस त्या मुलांचा सांभाळ करणार. त्याही मोलमजुरी करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. अशा परिस्थितीत अनाथ झालेल्या या दोन्ही मुलांचे भवितव्य काय राहील, अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये ऐकावयास मिळाली. लहान मुलगा आकाश हा त्यांच्यासोबतच झोपलेला होता. पहाटे ५ वाजता रामदासने बबिता गाढ झोपेत असताना तिच्या डोक्यात ५ ते १० किलो वजनाचा मोठा दगड घातला. यात तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

Web Title: Wife's blood on stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.