वाढदिवसाला जेवायला जाणे नाकरल्यामुळे पत्नीस बदडले

By राम शिनगारे | Updated: July 30, 2023 20:45 IST2023-07-30T20:45:04+5:302023-07-30T20:45:11+5:30

पिसादेवी परिसरातील घटना : पतीच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल

Wife beaten by husband for refusing to go to dinner on her birthday | वाढदिवसाला जेवायला जाणे नाकरल्यामुळे पत्नीस बदडले

वाढदिवसाला जेवायला जाणे नाकरल्यामुळे पत्नीस बदडले

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जेवण्यासाठी जाऊ अशी गळ घालणाऱ्या पतीला पत्नीने जेवण्याऐवजी मुलांच्या शाळेतील पुस्तके घेऊन या, असे सांगितले. त्यामुळे राग आलेल्या पतीने पत्नीसोबत भांडण करीत बेदम मारहाण केली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पिसादेवी परिसरात राहणाऱ्या सैय्यद जावेद शहा आबेद शहा यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस होता. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीस आपण वाढदिवसानिमित्त बाहेर जेवण्यासाठी जाऊ असे सांगितले. तेव्हा पत्नीने घरी जेवण बनवले आहे. आता बाहेर जायचे नको, घरीच जेवण करू, तुम्ही फक्त मुलांच्या शाळेचे पुस्तके घेऊन या असे सांगितले.

त्यावर पती सैय्यद जावेद शहा यांनी पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातुन पतीने शिविगाळ करीत पत्नीला हातचापटाने मारहाण केली. त्यानंतर लाकडी स्टंपने बेदम मारले. या प्रकरणी पत्नीने २९ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीनुसार पतीच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 

Web Title: Wife beaten by husband for refusing to go to dinner on her birthday