प्रेमगप्पामध्ये बाधा आणणाऱ्या पतीवर चाकूहल्ला करून पत्नीचे प्रियकरासोबत पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:39 IST2018-06-20T12:34:30+5:302018-06-20T12:39:02+5:30

प्रियकरासह घरात गप्पा मारत बसलेल्या पत्नीला जाब विचारणाऱ्या पतीवर पत्नीने हल्ला चढवला

wife attacked on husband while he make disturbance in chat with lover | प्रेमगप्पामध्ये बाधा आणणाऱ्या पतीवर चाकूहल्ला करून पत्नीचे प्रियकरासोबत पलायन

प्रेमगप्पामध्ये बाधा आणणाऱ्या पतीवर चाकूहल्ला करून पत्नीचे प्रियकरासोबत पलायन

औरंगाबाद : प्रियकरासह घरात गप्पा मारत बसलेल्या पत्नीला जाब विचारणाऱ्या पतीवर पत्नीने हल्ला चढवत, प्रियकरासोबत घरातून पळ काढल्याची घटना १७ जून रोजी चिकलठाणा परिसरात घडली. 

भगवान भीमराव दिवेकर (२७, रा. चिकलठाणा परिसर) याची पत्नी प्रियकरासह घरात गप्पा मारत बसली होती. अचानक भगवान दिवेकर घरात गेला. तेव्हा त्याने ही कोण व्यक्ती आहे, अशी विचारणा केली. त्यावरून पती-पत्नीत वाद झाला. वाद एवढा विकोपाला जाऊन आरडाओरड सुरू झाली. यावेळी रागाच्या भरात पत्नीने कांदा कापायच्या चाकूने भगवानवर वार करून धक्का दिला; त्यामुळे भगवान जमिनीवर पडला.

त्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत दुचाकीवर बसून धूम ठोकली. या प्रकारानंतर जखमी अवस्थेत भगवानने  एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार खिल्लारे करीत आहेत. 
 

Web Title: wife attacked on husband while he make disturbance in chat with lover