सोयगाव परिसरात मृत सापडलेला बिबट्या कशाने मेला? अहवालाची प्रतीक्षा...

By साहेबराव हिवराळे | Updated: August 25, 2023 20:25 IST2023-08-25T20:23:51+5:302023-08-25T20:25:02+5:30

१५ ऑगस्ट रोजी हा मृत बिबट्या सरकारी गायरानात सापडला.

Why did the leopard found dead in Soygaon area die? Awaiting report... | सोयगाव परिसरात मृत सापडलेला बिबट्या कशाने मेला? अहवालाची प्रतीक्षा...

सोयगाव परिसरात मृत सापडलेला बिबट्या कशाने मेला? अहवालाची प्रतीक्षा...

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव परिसरात मृत सापडलेल्या बिबट्याचा ‘घातपात’ झाला की त्याने कुणाच्या जनावरांवर हल्ला केला, अशा सर्वांगाने तपास वन विभाग करीत आहे. शवविच्छेदन प्रसंगी काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, त्यानंतरच तपासाला दिशा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

१५ ऑगस्ट रोजी हा मृत बिबट्या सरकारी गायरानात सापडला. दुर्गंधी येत असल्याने कर्मचाऱ्याने ही माहिती वन विभागाला दिली. पण तोपर्यंत कुजूनही तो कुणाला का दिसला नाही? की त्याची कोणी हत्या केली? की गोचिड ताप येऊन तो मृत झाला, या प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवालातून समजतील.

सोमवारी अहवाल मिळण्याची शक्यता
शवविच्छेदनानंतर त्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रयोगशाळेकडून नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजेल. सोमवारपर्यंत अहवाल मिळण्याची शक्यता आहे, असे सहायक वनसंरक्षक रोहिणी साळुंखे यांनी सांगितले.

अशक्त बछड्याचे रक्ताच्या नमुने पाठविले...
वैजापूर शिवारात सापडलेला बछडा अशक्त का झाला होता, हे समजण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठविलेले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.
- शंकर कवठे, वन परिक्षेत्र अधिकारी, वैजापूर

Web Title: Why did the leopard found dead in Soygaon area die? Awaiting report...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.