शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:37 IST

Rain In Marathwada : मान्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने वाढत असलेला बाष्पीभवनाचा टक्काही याला कारणीभूत आहे.

ठळक मुद्देतासाभरात १०० मि. मी.हून अधिक पाऊसहवेच्या ‘डाऊन ट्रॅप’मुळे मराठवाड्यात ढगफुटी

- विकास राऊत

औरंगाबाद : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने मागील सलग दोन वर्षांपासून मराठवाड्यातील ( Rain In Marathwada )  बहुतांश मंडलात १०० मि. मी.हून अधिक पाऊस तासाभराच्या अंतरात होत असल्याने खरीप हंगाम हातून जातो आहे. यंदाही त्याच दिशेने मराठवाडा चालला असून, ओल्या दुष्काळाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. दिवसभर दमट वातावरणामुळे बाष्पीभवन होऊन सायंकाळच्या सुमारास पाऊस होण्याचा हा प्रकार हवेचा डाऊन ट्रॅप असून, ढगफुटीसारखाच ( Cloud Burst In Marathawada ) हा पाऊस असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. ( Why are there cloud burst in Marathwada ? Find out exactly what the ‘down trap’ of the air is all about) 

मागील दहा दिवसांत ११७ मंडलांमध्ये १०० मि.मी.च्या पुढे पावसाची नोंद झाली आहे. विभागात ४६३ मंडले असून, जवळपास सर्वच मंडलात कमी अधिक पाऊस झाला आहे. २०० मंडले ८० ते ९० मिलिमीटरच्या आत आली आहेत. ६५ मि. मी.पर्यंत पाऊस होणे म्हणजे सर्वसाधारण अतिवृष्टीची नोंद होते. ९० मि. मी.पुढे झालेला पाऊस ढगफुटीसारखाच असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात. दरम्यान, हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

का होतो आहे पाऊसवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले, एका तासात १०० मि. मी.पेक्षा अधिक पाऊस झाला की, ढगफुटी (क्लाऊड बस्ट) म्हटले जाते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा शक्तिशाली पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाऊस पडतो आहे. अतिवृष्टीमध्ये झालेला पाऊस क्लाऊड बस्टमध्ये १०० मि. मी.पेक्षा अधिक असेल तर तो ढगफुटीसारखा गृहीत धरला जातो. मागील चार दिवसांपासून पाऊस नियमित सुरू असल्यामुळे जमिनीत पाणी थांबत नसल्यामुळे नुकसान होत आहे.

मान्सून पॅटर्न बदललाहवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या मते, हवेचा डाऊन ट्रॅप होत असल्याने ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे. मान्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने वाढत असलेला बाष्पीभवनाचा टक्काही याला कारणीभूत आहे. जागतिक हवामान संघटनेने अतिवृष्टी, महावृष्टी या अवैज्ञानिक शब्दांना मान्यता दिलेली नाही. मात्र, क्लाऊड बस्ट म्हणजे ढगफुटी तसेच त्यामुळे कमी वेळातील महापूर म्हणजे फ्लॅशफ्लड हे वैज्ञानिकरित्या व डब्ल्यूएमओने मान्यता दिलेले शब्द आहेत.

रडारमुळे पाऊस थांबणार नाही, पण...एक्स बॅण्ड व के. ए. बॅण्ड फ्रिक्वेन्सीवर कार्यान्वित होणारे डॉप्लर रडार जे अगदी बोटाच्या पेराएवढ्या लहान आकारमानात किती पाणी, बर्फकण व बाष्प आहे, याची माहिती देते. ज्यावरून ढगाच्या एकूण आकारमानानुसार ढगात एकूण किती लिक्विड वॉटर कन्टेन्ट आहे. या माहितीच्या माध्यमातून ढगफुटी कोणत्या अक्षांश व रेखांशावर हा भार किती तीव्रतेची असेल. नेमका किती वाजता पाऊस होईल, याची अत्यंत अचूक माहिती त्यातून मिळते. त्यामुळे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रडार असणे गरजेचे आहे. रडारमुळे पाऊस थांबणार नाही, परंतु जीवित हानी टाळणे शक्य होईल.

ढगफुटीला यामुळे मिळतो दुजोरा : २६ ऑगस्ट: ८२ मंडलात अतिवृष्टी नोंद, २२ हून अधिक मंडलात जोरदार बरसला.३१ ऑगस्ट : ६७ पैकी २४ मंडलात १०० मि. मी.च्या पुढे पावसाची नोंद झाली.१ सप्टेंबर: ७ मंडलात अतिवृष्टी झाली. दोन मंडलात १०० मि.मी.हून अधिक पाऊस५ सप्टेंबर: ८५ मंडलात अतिवृष्टी, यापैकी ४० मंडलात १०० मि. मी.हून अधिक पाऊस६ सप्टेंबर: १६ मंडलात दमदार पाऊस झाला. अतिवृष्टीची नोंद झाली.७ सप्टेंबर: ५०पैकी १३ मंडलात १०० मि. मी.पेक्षा अधिक पाऊस झाला.८ सप्टेंबर : १४५ मंडलात अतिवृष्टी, ५० मंडलात १०० मि. मी.हून अधिक पाऊस.

हेही वाचा - - आजारी आई-वडिलांचा आधार पावसाने हिरावला- शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी; नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडा