शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 19:16 IST

पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

ठळक मुद्देआरोपी बसचालकाची जामिनावर सुटकामुकुंदवाडी पोलिसांकडून तपास 

औरंगाबाद : पथदिव्यांच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून जालना रोडवर पडल्याने बसखाली चिरडून ललिता शंकर ढगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी बसचालकांवर अटकेची कारवाई केल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आता तुटलेल्या केबलकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी सुरू केली. पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

 मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जालना रोडवरील रामनगर येथे भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला पथदिव्याच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून पडताच मागून सुसाट आलेल्या बसखाली चिरडून ठार झाली होती. या भीषण दुर्घटनेनंतर त्याच दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळावरून बससह पसार झालेला बसचालक भारत वसंतराव निनगुरकरला पोलिसांनी २१ जानेवारी रोजी अटक केली. रस्त्यावर पडलेल्या पथदिव्यांच्या तुटलेल्या के बल वायरमध्ये अडकल्याने दुचाकीसह ललिता पडल्या होत्या. अनेक दिवसांपासून रस्त्यावर तुटलेली केबल वायर लोंबकळत होती. याकडे महापालिकेच्या विद्युत विभाग आणि संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले.

भूमिगत केबलचा दोष शोधून काढून पथदिव्यांना वीजपुरवठा करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने थेट डी.पी.मधून वीज जोडणी घेतलेल्या वायर ओव्हरहेड पद्धतीने पथदिव्यांपर्यंत नेले होते. जालना रोडवरील विविध पथदिव्यांवर हे के बल वायर लोंबकळत होते. मात्र रात्रीतून ती केबल गायब करण्यात आली. मात्र पोलिसांनी  घटनास्थळी पडलेल्या त्या केबल वायरची छायाचित्रे काढली होती. रस्त्यावर केबल लोंबकळण्यास जबाबदार कोण, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून माहिती मागितली आहे. 

बसचालकाची जामिनावर सुटकाआरोपी बसचालक भारत निनगुरकरला पोलिसांनी जामिनावर सोडल्याचे समोर आले. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर तात्काळ पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी भारत घटनास्थळावरून पसार झाला होता.

मनपावर गुन्हा दाखल कराललिता ढगे यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या मनपाच्या ढिसाळ कारभाराविषयी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत कासलीवाल पूर्व येथील रहिवासी, तसेच युवा मंडळाने जालना रोडवरील त्या अपघातस्थळाजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. ढगे यांच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी अशी लक्षवेधी निदर्शने केली. 

पोलीस परवानगीशिवाय उचलले केबलआपल्या केबल वायरमुळे दुचाकीस्वार महिलेचा बळी गेल्याचे कळताच रात्रीतून गुपचूप केबल उचलून नेण्यात आली. विशेष म्हणजे मुकुंदवाडी पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करून ती केबल जप्त करायची होती. मात्र तत्पूर्वीच कातडी बचाव अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही केबल उचलण्यात आल्याचे दिसून येते.

मनपाकडून माहिती येताच संबंधितांवर कारवाईमहापालिक ा आयुक्तांना पत्र पाठवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केबलची जबाबदारी कोणाची आहे, याविषयी माहिती मागितली आहे. ही माहिती मिळताच, याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.-उद्धव जाधव, पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी ठाणे

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका