बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:02 IST2018-04-15T00:00:54+5:302018-04-15T00:02:07+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच हृदयविकाराने निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
‘वणवा’, ‘शरण’,‘चिंगारी बनेगी क्रांती’ ही सुरडकर यांनी लिहिलेली व गाजलेली नाटके. ‘मनुच्या गावातील जातीची बिºहाडे’ हा त्यांचा काव्यसंग्रहही क्रांतिकारी ठरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अधिष्ठान घेऊन त्यांनी आपले सारे लिखाण केले होते आणि आज आंबेडकर जयंतीदिनी बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. त्यांची अंत्ययात्रा निघेल. बेगमपुरा स्मशानभूमीत सुरडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.