शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कुठे हरवले रक्ताचे नाते? वृद्धाश्रमातील १८१ आईबाबांकडे पोटच्या गोळ्याचा मृत्यूनंतरही कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:43 IST

शेकडो आई-बाबांनी मुलांच्या आठवणीतच मिटले डोळे

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : इटुकल्या हाताने बाबांचे बोट धरून चालताना-खेळताना ती बऱ्याचदा धडपडायची, रडायला लागायची, तेव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय ती शांत होत नसे. ती ६ महिन्यांची असताना आई हे जग सोडून गेली. आईची मायाही त्यांनीच लावली. मुलीसाठी आयुष्यभर लग्न केले नाही आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी मुलगी अंत्यसंस्कारालाही आली नाही. हे एकच उदाहरण नव्हे, तर असे शेकडो अनुभव वृद्धाश्रम चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वृद्धाश्रमात आजवर अशा १८१ वृद्धांचा मृत्यू झाला ज्यांना त्यांची मुले शेवटी पाहायला, भेटायलाही आली नाहीत. सुशिक्षित, उच्चपदस्थ मुलांचाही यात समावेश आहे, हीच खरी शोकांतिका.

मुलांसाठी झिजले...जालन्यातील एक आजोबा ज्यांनी सायकलवर कपडे विकून दोन्ही मुलांना शिक्षक केले. सतत सायकल चालवल्यामुळे त्यांच्या पाठीत अक्षरश: बाक आला. त्यांच्या उतारवयात मधुमेहामुळे वडिलांना जास्त खायला लागते या कारणामुळे मुलांनी त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात आणून सोडले. वृद्धाश्रमात आणल्यानंतरही येथील कर्मचाऱ्यांना मुलांनी वडिलांना कमी जेवण देण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचा लवकर मृत्यू होईल. यावर कर्मचाऱ्याने त्यांची खरडपट्टी काढल्यानंतर ते खजील झाले. ५ वर्षांनी आजोबा गेले. त्यापूर्वी त्यांनी आपले शेवटचे विधी मूळ गावी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती; पण मुलांनी यालाही नकार दिला. शेवटी लोकलज्जेस्तव ते स्मशानभूमीत आले. मात्र, अंत्यसंस्कार सोडून नातेवाइकांसोबत भांडणातच ते गुंतले. शेवटचे संस्कार वृद्धाश्रमानेच केले.

शेवटी एकटेचआस्था फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात राहणारे एक आजोबा ज्यांना मुलगी आणि पत्नीने घर स्वत:च्या नावावर करून घेत हाकलून लावले. कुठे-कुठे भटकल्यानंतर कोण्या एका नातेवाइकाच्या मदतीने ते वृद्धाश्रमात राहायला आले. घरासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. अनेक वर्षे प्रकरण चालले. मात्र, शेवटी निकालाच्या आधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे शेवटचे दर्शन घ्यायलादेखील मुलगी, पत्नी आल्या नाहीत.

अशी आहे संख्यामातोश्री वृद्धाश्रम : १७० (मागील ३० वर्षांत)कृपाळू वृद्धाश्रम : ०२ ( मागील ३ वर्षांत)आधार वृद्धाश्रम : ०३ ( मागील ८ वर्षांत)माणुसकी वृद्धाश्रम : ०३ ( मागील ३ वर्षांत)आस्था वृद्धाश्रम : ०३ ( मागील १० वर्षांत)एकूण- १८१

आपले वडील किंवा आई यांचा मृत्यू झालाय हे आम्ही लगेचच मुलांना कळवतो. अनेकदा ते येत नाहीत, त्यातल्या त्यात जे येतात ते हातही लावत नाहीत. नाकाला फडके बांधून लांब उभे राहतात.-सागर पागोरे, मातोश्री वृद्धाश्रम

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक