अखंड वीजपुरवठा कधी होणार ? महावितरणचा कारभार कधी सुधारणार?

By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2024 03:34 PM2024-04-18T15:34:47+5:302024-04-18T15:44:04+5:30

गारखेडा परिसरात आपत्कालीन भारनियमन; तापमानासह अवकाळीचा दणका

When will there be uninterrupted power supply? When will the administration of Mahavitran improve? | अखंड वीजपुरवठा कधी होणार ? महावितरणचा कारभार कधी सुधारणार?

अखंड वीजपुरवठा कधी होणार ? महावितरणचा कारभार कधी सुधारणार?

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या तापमानामुळे व त्यामुळे वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे गारखेडा परिसरातील काही वीजवाहिन्यांवर महावितरणला नाईलाजास्तव आपत्कालीन भारनियमन सुरू करावे लागले आहे.

एन-४ येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे त्यावरील ११ केव्ही गारखेडा वाहिनीचा भार ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रावर घेण्यात आलेला आहे. परंतु मागील ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेमुळे अचानक वीज मागणी वाढली आहे. त्यामुळे ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रामधील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत आहे. परिणामी काही वीजवाहिन्यांवर रात्री १० ते २ वाजेपर्यंत कुठल्याही वेळेस सुमारे २ तास आपत्कालीन भारनियमन होण्याची शक्यता आहे.

यात ११ केव्ही गजानननगर वाहिनीवरील सारंग हाउसिंग सोसायटी, नंदिग्राम नंदीग्राम सोसायटी, कडा कार्यालय, वेद मंत्रा, चैतन्य हाउसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, विशालनगर, अलंकार सोसायटी, त्रिमूर्ती चौक, शांतिनिकेतन कॉलनी, उत्तमनगर, भानुदासनगर, विष्णुनगर, अरिहंतनगर, मित्रनगर, ११ केव्ही सुहास कॉलनी वाहिनी व ११ केव्ही गारखेडा वाहिनीवरील यश मुथियान, नाथ प्रांगण, साहस सोसायटी, आदिनाथनगर, भांडार चौक, के पॉन्ड हॉस्पिटल, प्रेरणानगर, विजय चौक, स्वप्ननगरी, माणिकनगर, हनुमाननगर, पुंडलिकनगर, हुसेन कॉलनी, छत्रपतीनगर, ११ केव्ही मुथा वाहिनीवरील मेहरनगर, गारखेडा गाव, उल्कानगरी, सहयोगनगर, हिरण्यनगर, हनुमाननगर, शास्त्रीनगर, भगवती कॉलनी, अशोकनगर, हेडगेवार हॉस्पिटल, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आदी भागांत वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. एन-४ उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर गुरुवारी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व समस्या मार्गी लागतील.

गुरुवारी काही भागांत वीज बंद..
दरम्यान, पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामासाठी एन-४ उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या काही वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी (१८ एप्रिल) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यात मालाणी डीटीसी, मायानगर, सिडको एन-२, एन-३, अजयदीप काम्प्लेक्स, मानसी हॉटेल, गुरुसाहनीनगर, तिरुपती पार्क, चौधरी डीटीसी, एन-४, पारिजातनगर, विवेकानंदनगर, विश्रांतीनगर, उच्च न्यायालय, गारखेडा परिसराचा समावेश आहे, ग्राहकांनी सहकार्य अपेक्षित आहे, असे महावितरणने कळवले आहे.

Web Title: When will there be uninterrupted power supply? When will the administration of Mahavitran improve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.