शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी?

By स. सो. खंडाळकर | Updated: September 3, 2025 20:13 IST

विकास मीना यांना तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता मुहूर्त

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेची नूतन इमारत सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याला मुहूर्त कधी लागणार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंकित यांच्या आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना तर यंदाच हा मुहूर्त १७ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता. आता ते येथून बदलून जिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला रुजू झालेले आहेत. ते तिकडे गेले आणि इकडे नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय थंड बस्त्यात पडला.

काही जाणकारांकडून माहिती घेतली असता, या १७ सप्टेंबरचा मुहूर्त तर सोडाच, पुढच्या १७ सप्टेंबरपर्यंतही उद्घाटन होणार नाही. ही ३ मजली इमारत बाहेरून फारच छान दिसते. परंतु आतून पाहणी केली असता, तेथे अनेक समस्या निर्माण झाल्याचे कळते. आत व्हेंटीलेशनचीही सोय नाही.

एमएसईबी व जिल्हा परिषदेत सुरू आहे साठमारीजिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीला हवा असलेला विद्युत पुरवठा कसा मिळेल, या चिंतेत प्रशासन आहे. एमएसईबी त्या भागासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडेच जागेची मागणी करीत आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास आम्हाला मोफत वीज द्या, अशी भूमिका जिल्हा परिषदेची आहे. कारण मग त्याच ट्रान्स्फॉर्मरवरून तुम्ही इतरांंनाही विद्युत पुरवठा करून धंदा करणार असे जिल्हा परिषदेला वाटते. यातून कसा तोडगा निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फर्निचरसाठी हवेत १० कोटीनूतन इमारतीच्या बांधकामावर आतापर्यंत शासनाकडून सुमारे ४,४४९.४४ लाखांचा निधी प्राप्त झाला. आतापर्यंत ४,४४८.६२ लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित १५ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. विद्युत पुरवठा कामांसाठी ९ कोटींची तर फर्निचरसाठी १० कोटी ३५ लाखांची मागणी करण्यात आली आहे. शासनाने अलीकडेच विद्युतीकरणाच्या कामासाठी जिल्हा परिषद उपकरातून ६ कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून देण्यात आली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzpजिल्हा परिषद