काळा पैैसा कधी आणणार : अजित पवार
By Admin | Updated: October 8, 2014 00:51 IST2014-10-08T00:37:04+5:302014-10-08T00:51:18+5:30
किल्लारी : सरकार आल्यानंतर शंभर दिवसात परदेशातला काळा पैैसा देशात आणू, अशी भीम गर्जना नरेंद्र मोदींनी केली होती़ शंभर दिवस उलटूनही काळा-गोरा पैैसा नरेंद्र मोदींना आणता आला नाही़

काळा पैैसा कधी आणणार : अजित पवार
किल्लारी : सरकार आल्यानंतर शंभर दिवसात परदेशातला काळा पैैसा देशात आणू, अशी भीम गर्जना नरेंद्र मोदींनी केली होती़ शंभर दिवस उलटूनही काळा-गोरा पैैसा नरेंद्र मोदींना आणता आला नाही़ ते केवळ थापा मारून सत्तेत आले आहेत़ विधानसभेच्या या निवडणुकात त्यांच्या थापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले़
औसा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश्वर बुके यांच्या प्रचारानिमित्त किल्लारी येथे सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ मंचावर उमेदवार राजेश्वर बुके, प्रा़एऩबी़शेख, आ़ विक्रम काळे, संजय शेटे, दिनकर मुगळे, माजी सभापती शशिकांत जवळगे, दत्ता कोळपे, बबन भोसले, राजकुमार सूर्यवंशी, विश्वास काळे, जयपाल भोसले, रमेश हेळंबे, हरूण आत्तार, वलिखाँ पठाण, पाशा शेख, अमर बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी मुतूर्जा शेख, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती़ अजित पवार पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना भुरळ घालून मते मिळविली़ महागाई कमी करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, रोजगार निर्मिती करू, अशा थापा मारून भाजपाने मते घेतली़ मात्र या सरकारने गेल्या शंभर दिवसात काहीच केले नाही़ उलट शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतले आहेत़ सामन्यांसाठी युपीए सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची संख्या वाढविली होती़ मात्र नव्या सरकारने ती संख्या कमी केली आहे़ यामुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे़