शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

काय बोलता! शाळू ज्वारी सहा हजारी; बाजरीची भाकरीसाठीही थंडीत खिसा गरम करावा लागणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 1, 2023 18:25 IST

ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शाळू ज्वारीचे भाव ६ हजार रुपये क्विंटल असे सांगितले तर तुम्ही एकदम भुवया उंच करता ‘काय बोलता... ’. असे म्हणाल पण, हे खरं आहे शाळू ज्वारी पहिल्यांदाच सहा हजारी बनली आहे. एवढेच नव्हे तर हिवाळा सुरू झाला असून बाजरीची भाकरी खाण्याअगोदर खरेदीसाठी खिसा गरम करावा लागणार आहे.

मध्यंतरीचा काळा असा होता की, ज्वारी व बाजरी हे मध्यमवर्गीय, गरीबांचा आहार समजल्या जात होते. पण आता याची पौष्टिकता लक्षात आल्यावर व कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नवनवीन वाणाची निर्मिती केल्याने शाळू ज्वारी असो वा बाजरी खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नव्हे तर मधुमेही रुग्णांना गव्हाच्या पोळीपेक्षा अलटून पालटून कधी ज्वारीची भाकरी तर कधी बाजरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे.

शाळू ज्वारीचे का वाढले भावएरवी शाळू ज्वारी ३५०० ते ४००० रुपये क्विंटल विकली जाते. मात्र, एप्रिल-मे महिन्यात ज्वारीचे उत्पादन कमी झाले. त्याचा आता परिणाम जाणवत आहे. शाळू ज्वारी ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल आता विकत आहे. या भावातही चांगल्या दर्जाची ज्वारी मिळत नाही, हे विशेष. नवीन शाळू ज्वारी आता पुढील वर्षी मार्चमध्ये होळी सणानंतर येईल. तोपर्यंत भाव चढेच राहतील.

थंडी अन् बाजरीची गरम भाकरीथंडीच्या दिवसात गरमागरम बाजरीची भाकरी खाण्याची मज्जा काही और असते. पाऊस कमी पडल्याने यंदा बाजरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे बाजारीचे भाव क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत. मागील वर्षी २५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल मिळणारी बाजरी सध्या ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल खरेदी करावी लागत आहे.

हलका गहू ३२०० रुपयालानुसते बाजारी व ज्वारीचे भाव वाढले नाही तर गव्हाचे भावही वाढले आहे. गव्हाचे भाव ३२०० रुपये ते ४००० रुपये प्रति क्विंटल आहेत. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात झालेली निर्यात तसेच शासनाच्या गोदामात गव्हाचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने शिवाय पावसा अभावी सध्या पेराही कमी असल्याने भविष्यात किती भाववाढ होईल हे सध्या सांगता येत नाही.-जगदीश भंडारी, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र